बच्चू कडू यांची तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज  प्रोफाईल या प्रदूषकारी व कामगार सुरक्षा नियमांना फाट्यावर मारणाऱ्या कारखान्यांना अचानक भेट !

" विराज प्रोफाईल कंपनीतील कामगारांची सुरक्षितता धोक्यात सर्व नियमांना फाट्यावर मारत कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व कामागार अधिकार्‍यांना कामगार राज्यमंत्री बच्चू कडूनी घेतले फैलावर"

तारापूर: दि. ९, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विविध केमिकलचे व इतर उत्पादने घेणाऱ्या ठराविक कारखान्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट, अपघात व दुर्घटना आणि या घटनांमध्ये निष्पाप कामगारांचे जाणारे बळी याबाबत कामगार मंत्रालयात असंख्य तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूवीवर या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विराज प्रोफाईल या कंपनीला आचानक भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 राज्यमंत्र्यांनी दिलेल्या या अचानक भेटीमुळे कंपनीचे व्यवस्थापनासह सर्व अधिकारी हादरून गेले होते. विराज प्रोफाईल या कंपनीमध्ये अपघात घडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या कंपनीमध्ये सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही, हे उघडकीस आले, तसेच कामगारांना काम करतांना सुरक्षेची जी साधने देने अनिवार्य असते, तीही त्यांना देण्यात येत नाहीत. अपघातग्रस्त कुटूंबियांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येत नाही. या सर्व महत्वाच्या विषयी राज्यमंत्र्यांनी आरोग्य व औद्योगिक संचालनालय, कामगार उपायुक्त कार्यालयच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 

या भेटीदरम्यान राज्यमंत्र्यांनी या औद्योगिक क्षेत्रात कोणकोणत्या कारखान्यात नियमित अपघात घडतात,अपघात घडण्यामागची कारणे काय,त्यावर कार्यवाही व पुन्हा अपघात घडू नये,यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या,अपघात घडणाऱ्या कारखान्याची दस्ताऐवज उपलब्ध आहेत का ? परवाने नूतनीकरण,कारखाना आराखडा मंजुरी,नियमित मॉकड्रिल, कामगारांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण, हेल्मेट,प्लास्टिक हातमोजे, मास्क, अग्निरोधक जाकीटस, आरोग्य तपासणी, इ महत्वाच्या विषयी त्यांनी कंपनी व्यवस्थापन व शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच कामगारांच्या औद्योगिक सुरक्षिततेबाबत १५ दिवसांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल असेही यावेळी मा.कामगार राज्यमंत्र्यांनी प्रतिपादित केले यावेळी त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे संपर्क प्रमुख/पालघर जिल्हाप्रमुख हितेश जाधव व मंत्रालयीन विशेष कार्य अधिकारी तथा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय अधिकारी उपस्थित होतेराज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या आचानक भेटीमुळे कामगार वर्गामध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे. कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याशी समझोता करत कारखानदार व दलालांशी हात मिळवनी करून कामगारांची आरोग्य तपासणी नकरताच प्रती कामगार 200 रुपये असे लाखो कामगारांवर करोडोंची कमाई घेऊन कागदोपत्री सर्व काही "ऑल इज वेल" असल्याचे दाखवणाऱ्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या भ्रष्ट अधिकार्‍यांवर लगाम घातला जाणार का व कामगारांना त्यांचे हक्क मिळणार का हे पाहाने औचित्याचे ठरेल.