"कुसुम" येतीय सोनी मराठीवर ४ ऑक्टोंबरपासून माहेरची आणि सासरची नाळ जोडायला... 
 
"कुसुम" ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर ही प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री "शिवानी बावकर"  या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या शीतली या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली आहे. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे . नवीन मराठी मालिका, "कुसुम"  ही मालिका ४ ऑक्टोबरपासून, रात्री ०८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणारी कुसुम, सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात आला आहे. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसेल. दुनियेसाठी खपायचं  आणि आईबापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जबाबदाऱ्या  उत्तम पार पाडते.
 
२००१ साली हिंदीमध्ये  कुसुम नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी रूपांतर आहे. तेंव्हाही  ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कुसुम  दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली व स्त्रियांचं प्रतिनिधित्व करत, ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल. सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते.   
 
या मालिकेबद्दल एकता कपूर म्हणाली की २१ वर्षानंतर  कुसुम  प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर  कुसुम  आणण्याची संधी मला मिळाली.  कुसुम  ही  मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये या आधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली.