"या प्रकरणी ऑगस्ट २०१९ मध्ये पालघर जिल्ह्यातील मोजक्याच वर्तमानपत्रांमधून  (बोईसर तारापूर मित्र, पालघर मित्र व चौफेर संघर्ष ) बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, याच सोबर या भू माफियाचा कडाडून विरोध ही करण्यात आला होता."

भिवंडी: (BTM न्यूज नेटवर्क) ठाणे जिल्ह्यातील कोलशेत येथील आदिवासी शेतकरी कै. दत्तू नथू बारे यांची सर्व्हे नं. २८२/१ पैकी, एकूण १६७९० चौ. मी.  जमीन त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ वारसांकडून डॉ. विश्वास दाविद वळवी यांनी १४,९४,३१,०००/- रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारात विश्वास वळवी यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडे जमीन खरेदीची परवानगी मिळणेकामी चार वारसदारांना प्रत्येकी ३,७३,५७,८८५ /- रुपयांचा चेक देऊन फसवणूक केली होती.  

डॉ. विश्वास वळवी यांनी चार वारसदारांपैकी  वारसदार असलेल्या बाजीबाई तुकाराम कोम यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत तुझे बँक खाते उघडून तुझ्या खात्यात जमिनीचे तुझ्या हिश्श्याचे पैसे जमा करतो असे सांगत चेकबुक,कोरे कागद व काही फॉर्मवर अंगठे घेऊन बाजीबाई कोमच्या खात्यावर जमा असलेली करोडोंची रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे हस्तांतरित  करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बाजीबाई कोम यांचा मुलगा साजन कोम यानी तीन वर्षा पूर्वी कापुरबावडी पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

या तक्रारीवर सध्याचे गृह निर्माण मंत्री मा. जितेंद्र आव्हाड यांनी ही त्यावेळी न्यायाची मागणी करत या पिडीत कुटूंबा सोबत एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता व ठाणे शहर पोलीस आयुक्त यांचेकडे तक्रार दाखल केली होती.यानंतर सत्तेच्या लालसेने पालघर जिल्ह्यात मोठी बँनरबाजी करत २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत बोईसर विधानसभा क्षेत्राचे आपणच उमेदवार आसल्याचे भासवणाऱ्या डॉ. विश्वास वळवी हे, स्वतः आदीवासी असल्याचा गैर फायदा घेत आदिवासी कुटुंबाची जमीनी बळकावून  आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात बाबत मागणी केली होती. या प्रकरणात तब्बल तीन ते चार वर्षानंतर भा.दं.वि.क. ४२० आणि ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने उशीरा का होईना पण आदिवासींच्या जमिनी बळकावून स्वतःला देव माणूस म्हणून मिरवणार्‍या डॉ. विश्वास वळवी यांचा खरा चेहरा जनते समोर आला आहे.

दरम्यान पालघर जिल्ह्यात ही अनेक ठिकाणच्या आदिवासींच्या मोक्याच्या जमीनींवर डॉ. विश्वास वळवी याचा डोळा असून, काही जमीनी आशाच प्रकारे पालघर जिल्ह्यातीलच काही स्थानिक आदिवासी युवकांना सोबत घेऊन त्यांना प्रलोभन देऊन त्यांच्या मदतीने फक्त नाम मात्र रक्कम देऊन ताब्यात घेतल्या आहेत. या बाबत ही लवकरच बातमी प्रसिद्ध करण्यात येईल ...