बोईसर: दि. २३, बोईसर आगारातून कोल्हापूर, सांगली, सातारा कडे जाणाऱ्या लांब पल्याच्या खाजगी बससेवा बंद करण्यात याव्यात यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रवासी संघ, अखीलभरतीय मराठा महासंघ यांनी निकृष्ट दर्जाच्या वारंवार बंद पडणार्‍या व सर्व सामान्य प्रवाशांना न परवडणार्‍या बोईसर आगारातून कोल्हापूर, सांगली, सातार्‍याकडे जाणाऱ्या लांब पल्याच्या खाजगी बससेवा बंद करण्यात याव्यात अशी मागणी करत यासाठी आंदोलन करण्याचा इशारा पश्चिम महाराष्ट्र प्रवासी संघ व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे देण्यात आला होता. 

बोईसर आगारातून प्रवाश्यांच्या मागणी नुसार राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये लांब पल्याच्या बस सेवा कार्यकरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कराड, सातारा , कोल्हापूर, सांगली या भागात जाणाऱ्या प्रावशांसाठी एसटी महामंडळाने दिलेली बससेवा मात्र खाजगी बस पुरविणाऱ्या ठेकेदाराची असून या बसेस निकृष्ट दर्जाचा व लांब पल्ल्यासाठी फिट नसल्यामुळे वारंवार होणारा विलंब व बस रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

"प्रवाशांच्या सेवेसाठी " हे एसटीचे ब्रिद वाक्य खाजगी बस सेवा सुरु झाल्यापासून फक्त वाचण्यासाठीच  राहिले आहे. बसचा प्रवास व्यवस्थित व सुखर होण्यासाठी तसेच कोणताही खोळंबा झाल्यास प्रावशांना पर्यायी व्यवस्थ करून देणे नियमीत असताना ही ८ सप्टेंबर रोजी महामंडळाची बोईसर - कोल्हापूर बस क्रमांक  एमएच-०९
इएम ९२०६ रात्री २.३० च्या सुमारास भर पावसात खोपोलीच्या पुढे घाटात बंद
पडली असता रात्रभर सर्वत्र संपर्क करून ही बोईसर वा जवळच्याच पनवेल बस डेपो तुन सकाळी ८ वाजे पर्यंत बस उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यानंतर १८.०९.२०२१ रोजी कोल्हापूर हून बोईसर कडे येणारी बस ठाण्यात बंद पडली. त्यावेळी काही प्रवाशांनी आगारात संपर्क केले असता खाजगी बसेसची नोंद ठेवत नाहीत असे सांगण्यात आले होते.

अश्या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत पश्चिम महाराष्ट्र प्रवासी संघ व  अखील भरतीय मराठा महासंघाने तक्रारी दिल्या होत्या मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नये या साठी बोईसर आगारात आज दि. २३ रोजी आंदोलन करण्यात येणार होते.
मात्र कोरोना नियम व कायदा सुवेवस्थेचा प्रश्न पहाता बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी आंदोलनास परवानगी दिली नाही. मात्र प्रवाशी संघटनेचे शिष्टमंडळ आणि एसटी महामंडळ व्यवस्थापन यांची बैठक घेऊन तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार आज दि.२३ रोजी सकाळी ११.०० वाजता पश्चिम महाराष्ट्र प्रवासी संघ, अखील भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, बोईसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम, एपीआय सुरेश साळुंखे, पालघर विभागीय वाहतूक नियंत्रक आर.डी. जगताप, उप विभागीय वाहतूक नियंत्रक आशिष चौधरी, बोईसर एसटी आगार व्यवस्थपक पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी व इतर ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्याच्या बसेसची सेवा उत्तमप्रकारे देण्यात याव्यात प्रवासादरम्यान बस बंद पडणे व इतर तक्रारींवर तात्काळ निर्णय घेऊन प्रावाशांना पर्यायी बस सेवा देण्यात यावी,
तसेच खाजगी बसच्या चालकांची होत असलेल्या मनमानी कारभारला आळा बसेल असी उपाय योजाना इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आर.डी जगताप संबंधीत तक्रारींचे  ताबडतोब निराकरण करण्याचा प्रयत्न करू, तसेच प्रवासात बस बंद पडली असता तात्काळ दुरुस्त करू अथवा विलंब होत असेल तर पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू तसेच इतर बस सेवा  मागणी होत असेल तर त्या ही मागणीकडे लक्ष देऊन प्रावाशांना त्रास होणार नाही असाच प्रयत्न करू असे आश्वासन दिले.