"कंपनीतील माजी महिला कर्मचार्‍यांनी या कंपनीचे एच. आर. व्यवस्थापक नितीन टेकाडे हे अभद्र व्यवहार करित असल्याच्या तक्रारीवरून चोप दिल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओत म्हणटले आहे." 

तारापूर: दि.१९ रोजी, शनिवार दिनांक १८ रोजी दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. बजाज हेल्थकेअर लि. या कंपनीचे एच. आर. व्यवस्थापक नितीन टेकाडे यांना मनसे कार्यकर्त्यांनी एका माजी महिला कर्मचार्‍या सोबत अभद्र व्यवहार केल्याची तक्रार असल्याचे सांगत मारहाण केली आहे. 

दरम्यान याबाबत सोशल मीडिया व काही प्रसार माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिनांक: १९ रोजी पहाटे ०३.०० वाजताच्या  सुमारास उशिराने कंपनी व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून १० व्यक्तीं विरोधात गुन्हा रजी. क्र. २७९/२०२१, भादविसंक १४३, १४७, १४९, ४५२, ३२३, ५०४, ५०६, १०८ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम (३१)(१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मात्र वारंवार घडनार्‍या आशा घटनांमुळे बोईसर एमआयडीसी पोलीसांच्या कार्य प्रणालीवर महिला कार्मच्यार्‍यांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कंपन्यांमध्ये हजारो महिला काम करित आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेबाबत मालक व व्यवस्थापनाकडून नेहमीच निष्काळजीपणा केला जात असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. आशा वेळी बहुतांश महिला पोलीसांकडे तक्रार न करता स्थानिक राजकीय पक्ष / पार्टी / सामाजीक संघटण्यांच्या कार्यकर्त्यांकडे जातात. या कार्यकार्यांच्या आक्रमतेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तर पोलीस मात्र आमच्याकडे तक्रार आली नसल्याचे सांगत हात झटकताना दिसतात. एखाद्या कारखाण्यात अपघात झाल्यानंतर स्वतःहून गुन्हा दाखल करून घेणारे पोलीस आशा प्रकरणात कायद्याचा धाक व संधी साधू म्हणून मलीन झालेली प्रतीमा सुधारण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने सुमोटो दाखल करून या प्रकरणातील सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न करतील का हे पहावे लागेल.

"या प्रकाराबाबत कंपनी व्यवस्थापक नितीन टेकाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरच्या महिला कर्मचार्‍यांनी कंपनीचे Disciplinery Documents गहाळ केले असल्याने कंपनीच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली होती. त्या गोष्टीचा मनात राग धरून माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर कोणती कारवाई करायची त्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापन घेईल असे सांगितले आहे."

"त्या व्यक्ती बाबत या कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी   आमच्याकडे आल्या होत्या. आम्ही त्यास मनसे स्टाईलने समज दिली आहे."
*समीर मोरे मनसे नेते पालघर .*

या कंपनीत पूर्वी ही आशा प्रकारच्या घटना घडल्या असून याबाबत कंपनी मालक अनिल जैन यांना माहिती असताना ही ते  याकडे जानिवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याची माहितीविश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

या कंपनीत जर महिलांसोबत अभद्र व्यवहार व असशील वर्तन होत असेल तर, महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन काय कारवाई करणार ते पहावे लागेल ...