स्फोट आणि अग्निकांड मालिका सुरूच..
तारापूर: दि. ११, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. रंगरसायन  प्रा.लि. प्लाट नं. L-9/4, या लिक्विड प्रिटिंग इंक बनविणाऱ्या कारखाण्यात मध्यरात्री 2.00 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे आग. घटनेची माहिती मिळताच  2.05 वाजता तारापूर अग्निशमन दलाचे कर्मचारी 3 बंबांसह घटनास्थळी दाखल झाले होते. कंपनीत मोठ्या प्रमाणात सॉल्वंट संवर्गातील ज्वलनशील रसायनाच्या साठ्याने पेट घेतल्याने मोठ्याप्रमाणावर आग लागल्याने संपूर्ण कंपनीच जळून राख झाली आहे. 

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या 3 गडया व 12 जवानांसह पालघर नगर परिषद टॅप्स तारापूर, अडाणी पावर डहाणू अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांसह जवळपास ४० कर्मचारी यांनी अथक परिश्रमाने सकाळी 6 वाजता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. "यासाठी जवळपास 60 हून वेळा अग्निशमन बंब पाणी वापरावे लागल्याचे व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे व नियोजनबद्ध कार्य पद्धतीमुळे आजू बाजूच्या एकाही कंपनीला नुसान न होऊ देता शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती अग्निशमन तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी श्री. दिनेश अंभुरे यांनी दिली. 

शुक्रवार व गणेश उत्सोवाची सुट्टी असल्याने कंपनीत एका सुरक्षा रक्षका व्यतिरिक्त कोणी ही नव्हते, कोणती ही जीवीत हानी वा हात-हात झाली नाही.