रेमडेसीवीरचा (Remdesivir) निकृष्ट दर्जा आणि काळाबाजाराने घेतला का ? हजारो करोनाबाधीतांचा बळी... 

तारापूर: (BTM न्यूज नेटवर्क) दिनांक: 21 ऑगष्ट 2021, कोरोनाबाधीत रुग्णांना अंतिम उपचार म्हणून देण्यात येणारे रेमिडेसिवर (Remdesivir) इंजक्शन WHO ने नोहेंबर 2020 मध्ये प्रतिबंधीत केलेले असताना ही भारतात मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जानेवारी 2021 नंतर रुग्णालयांकडून करोना बाधीत रुग्णांवर उपचारार्थ याची मागणी व काळाबाजार जोमात सुरु होता व आहे.

विशेषत: मार्च-एप्रिल 2021 मध्ये M/s. Cipla Ltd. या नामांकित कंपनी कडून रेमडेसीवीर या इंजेक्शनचे उत्पादन तारापूर औद्योगिक क्षेत्रातील M/s.  Kamla lifesciences Ltd. प्लॉट नं. जी - 84/1, या कंपनीकडून जॉबवर्क करून महाराष्ट्रासह देशभरात वितरित केले जात होते. याच्या उत्पादन आणि वितरणावरती जिल्हाधिकारी पालघरयांचेसह अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासनाचे नियुक्त केलेल्या औषधे निरिक्षक यांची देखरेख व नियंत्रण होते. दरम्यानच्या कालावधीत देशासह राज्यभरात होत असलेल्या रेमडेसीवीरच्या काळाबाजाराचे कनेक्शन तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या याच कमला लाईफ सायन्स कंपनी पर्यंत येऊन पोचले होते. याच कंपनीतील कामगारांनी चोरी करून इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केल्याची माहिती कंपनी प्रशासनाने प्रसारमाध्यमांना व प्रशासनाला दिलेली होती. परंतु याप्रकरणी सिप्ला लिमिटेड व कमला लाइफ सायन्स या पैकी कोणीही रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीबाबत स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला नाही. उलटपक्षी याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या नाशिकच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने या सर्व प्रकरणाचे गुड कायम राहिले आहे.मार्च 2021 मध्ये याच कंपनीमध्ये सेक्सी उत्पादन करून महाराष्ट्रासह देशभरामध्ये वितरित करण्यात आलेल्या रेमडेसीवीर या इंजेक्शनच्या साठ्यातील चंड्डीगड व दिल्ली याठिकाणी वितरित करण्यात आलेली इंजेक्शन्स निकृष्ट दर्जाची असल्याचे ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट ऑफ दिल्ली (Drug control Department of Delhi) यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. 

यामुळे सिप्ला लि. व कमला लाईफ सायन्स यांनी करोना महामारीच्या कालावधीत स्वतःचे अर्थिक फायद्यासाठी रेमडेसीवीरच्या निकृष्ट दर्जाच्या इंजक्शनचा निर्मितीसह काळाबाजार करत करोडो लोकांच्या जीवीताशी खेळ केला असून यामुळेच अनेकांचे प्राण गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

{याबाबत सहायक आयुक्त (औषधे) श्री. पी. एन. कातकडे, परिमंडळ - 4, ठाणे, अन्न औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन, यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "सदर चाचणी अहवाल परराज्यातील घेतलेल्या नमुन्याचा परराज्यातील प्रयोगशाळेतील चाचणी बाबतीत असुन सदर अहवाल अद्याप या कार्यालयास प्राप्त नाही. या कार्यालयास प्राप्त झालेनंतर योग्य ती कार्यवाही घेतली जाईल." असे सांगितले आहे.}

करोना महामारीचा स्वतःचे अर्थिक फायद्यासाठी वापर करत निकृष्ट दर्जाचे रेमडेसीवीरची निर्मिती व काळाबाजार करून करोडो लोकांच्या जीवीताशी खेळणाऱ्या व लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत होत अब्जावधींचा फायद्या कमावणाऱ्या सिप्ला लि. व कमला लाईफ सायन्सवर महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार कोणती कारवाई करणार हे पाहणे औचित्याचे ठरेल. 

क्रमश:...

©www.tarapurmitra.com