पालघर दि 20 : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली  असून वैदेही वाढाण यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे यांची निवड झाली आहे.

 आज  दि.२०/७/२०२१ रोजी नियोजन भवन  जिल्हाधिकारी कार्यालय येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी सुरेखा थेतले आणि वैदेही वाढाण यांनी  तर उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे आणि  महेंद्र भोणे यांनी  नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली.माजी. जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांनी ७ जुलै २०२० रोजी  जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ९ जुलै २०२१ पासून समाजकल्याण सभापती विष्णू कडव  अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते.