तारापूर: दि.२८ फेब्रुवारी, २०२१: मागील प्रदिर्घ कालावधीपासून प्रस्तावित असलेल्या केंद्रिय वस्तु व सेवा कर (GST) भवनाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा श्री. राकेश कुमार शर्मा, प्रधान मुख्य आयुक्त, केंद्रीय वस्तु आणि सेवा कर आणि केंद्रीय उत्पाद शुल्क कार्यालय, मुंबई यांनी काल दि.२७ फेब्रुवारी, २०२१ रोजी पालघर आयुक्तालयाच्या केंद्रीय वस्तु आणि सेवा कर भवनाचे भूमिपूजन तारापूर औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीकडून उपल्बध करून देण्यात आलेल्या भूखंडावर पार पडले. या समारंभ श्री. लोरेनगोब डंग, मुख्य अभियंता सीपीडब्ल्यूडी मुंबई - I आणि टीआयएमएचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रधान मुख्य आयुक्तांच्या हस्ते भूमिपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. सीपीडब्ल्यूडी विभागाकडून प्रकल्प बांधकामासाठी आवश्यक मंजूरी मिळाल्याबद्दल आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पास लवकरात लवकर मंजुरी दिल्याबाबत त्यांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले. तारापूर एमआयडीसीमध्ये या कार्यालयाची स्थापना होत असल्याने करदात्यांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोपे व सोयीस्कर होणार आहे. यामुळे व्यवसाय करणे व GST च्या कार्यप्रणालीत अधिक सुलभता येईल, असे प्रधान मुख्य आयुक्तांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त, सीजीएसटी पालघर, मुख्य अभियंता, सीपीडब्ल्यूडी, मुंबई -१ आणि श्री डी.के. राऊत,अध्यक्ष टीआयएमए यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले.

या प्रकल्पामुळे मुंबई विभागातील सीजीएसटी व सेंट्रल अबकारी मालकीच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडेल. नवीन जीएसटी भवनाची निर्मिती ३९५२ चौ. मी. क्षेत्रावर होणार असून तळघर + ६ मजले आशा प्रकारे प्रस्तावित असलेल्या या इमारतीत तीन विभागीय कार्यालये आणि केंद्रीय वस्तु आणि सेवा कर, पालघर आयुक्तालयातील १४ रेंज कार्यालये असतील. या प्रकल्पासाठी येणारा एकूण खर्च रु. ३३ कोटी इतका असणार आहे. या इमारतीची रचना श्री जितेंद्र केआर यांनी केली असून श्री. कुलकर्णी हे आर्किटेक्ट म्हणून कामपाहणार आहेत. या ठिकाणी अधिकारी आणि येणाऱ्या करदात्यांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह सुसज्ज असेल, या इमारतीच्या बांधकामाचा ठेका हिल टॉप रेफ्रिजरेशन एजन्सीला देण्यात आला आहे. जुलै २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.