तारापूर: दि. २१, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. बजाज हेल्थकेयर या कंपनीत दि. १३, रोजी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास रियेक्टर जवळ आचानक स्फोट होऊन आग लागल्याने एक कामगार गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले होते. 

यातील निलेश बोरसे २८, हा गंभीररित्या भाजला गेल्याने त्यास प्रथम एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटलमधे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यास पुढिल उपचारार्थ त्वरित नवी मुंबई येथिल बर्न हॉस्पिटल मधे हलविण्यात आले होते. या ठिकाणी उपचारा दरम्यान दि. १९ रोजी निलेशचा मृत्यू झाला.

बजाज हेल्थकेयर या कंपनीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि पर्यावरणासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे अनुपालन (Compliances) केले जात नसल्याचे वारंवार दिसून आल्याने बजाज हेल्थकेयरच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ७ पैकी ४ कारखाण्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदचे आदेश दिले आहेत. असे असताना ही विनापरवाना (Un Consented product) उत्पादाचे उत्पादन सुरु असताना चुकीच्या कार्य प्रणालीमुळे निलेश बोरसेला त्याचा जीव गमवावा लागला आहे. वारंवार सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे.मागील वर्षी मालक व व्यवस्थापणाच्या निष्काकजीपणामुळे व चुकीच्या कार्यपद्धतीमुळे झालेल्या दुर्घटनेत जवळपास ४६ कामगारांना अंधत्वाकडे ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व आता निलेशच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बजाज हेल्थकेयरच्या मालकांसह व्यवस्थापकांवर "सदोष मनुष्यवधाचा गुन्हा" दाखल करण्याची मागणी कामगार प्रतिनिधींकडून होत आहे. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अपघातांचे वाढते प्रमाण व त्याची कारणे व आता पर्यंत जीव गमवाव्या लागलेल्या व कायमचे अपंगत्व आलेल्या कामगारांसह त्यांचे उद्धवस्त होत असलेले संसार पाहता गैर प्रकारे नियमांना डावलून उद्योग चालविणाऱ्या उद्योजकांना पाठीशी घालणार्‍या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर ही कारवाईची मागणी केली जात आहे.