"प्रदूषणकारी उद्योगांमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचे P.H., C.O.D., B.O.D., T.S.S. इत्यादी माणांकने दर्शविणाऱ्या ऑनलाईन फ्लो मीटर मधे, हे मीटर बनविणारी कंपनीच (M/s. Unitech Technocrats Pvt. Ltd. Vadodara Gujarat) उद्योजक व व्यवस्थापणास हवे तसे सेटिंग करूण देत असल्याचे स्टिंग मधून समोर आल्याने वाढत्या प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्याचे दिसत आहे."

तारापूर: (विशेष प्रतिनिधी)दि.२०, कारखाण्यांमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून पर्यावरण कायद्यातील नियम व माणकांप्रमाणेच सीईटिपीत व सीईटीपीतून बाहेर सोडण्यात यावे व यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व राज्य प्रदूषण नियत्रंण मंडळांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने आणि यात पारदर्शकता यावी जेणेकरुन वाढत्या जल व भू प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी निघणाणार्‍या प्रत्येक कारखाण्यास ऑनलाईन फ्लो मीटर आणि कॅमेरा लावून, त्याचे कनेक्शनची जोडणी केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे निरक्षणासाठी करण्यात आलेली आहे. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदुषणामुळे राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर हे देशातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषीत क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे. या ठिकाणच्या प्रदूषणकारी उद्योगांसह बहुतांश उद्योगांना  पर्यावरण कायद्यातील मार्गदर्शक तरतुदींनुसार निर्बंध लावले असून, पर्यावरण व परिसरातील मानवी संसाधनांची झालेली हानी भरुण काढण्यासाठी सीईटीपीसह प्रदूषकारी १०२ उद्योगांना १६० कोटी रूपयाचा दंड ठोठावला आहे. 

प्रदूषणकारी उद्योग व त्यांचे उद्योजक राष्ट्रिय हरित लवाद, केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांचे नियम व तरतुती आणि आदेशांना फाट्यावर मारत ऑनलाईन मीटर बनविणार्‍या Unitech Technocrats Pvt. Ltd. या कंपनी सोबत या मीटरमधे CPCB व MPCB हवे असलेले आकडेच ऑनलाईन दिसतील अशी सेटिंग करून देतअसल्यामुळे प्रदूषणात वाढच होत असल्याचे व येथिल उद्योजक पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या बाबतीत जानिवपूर्वक अर्थिक फायद्यासाठी उदासीन असल्याचे व दुर्लक्ष करित असल्याचे एका स्ट्रिंग ऑपरेशनमधून उघड करण्यात आले आहे.या प्रकरणी पर्यावरण दक्षता मंचातर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, Unitech Technocrats Pvt. ltd. या  कंपनीसह या कंपनीचे मीटर बसविलेल्या सर्व उद्योग व उद्योजकांची चौकशी करून  लवकरात लवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

या ऑनलाईन फ्लो मीटरच्या लोच्यात व गैर-प्रकारात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अधिकारी ही सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणती कारवाई केली जाणार हे पाहावे लागेल. 

{M/s. Unitech Technocrats Pvt. ltd. या कंपनीस या प्रकरणी विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.} 

हा ऑनलाईन फ्लो मीटरचा लोच्या व सेटिंगची "बनवाबनवी" तारापूर, महाराष्ट्रासह देशातील अजून कोण- कोणत्या राज्यात सुरू आहे याची चौकशी व कारवाई होणे आवश्यक आहे.