तारापूर: दि. १३, रोजी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास रियेक्टर जवळ आचानक आग लागल्याने एक कामगार गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत. ही ज्वालाग्राही (स्वालवंट) मधे लागल्याचे समजते वेळीच आग्निशमन दलाच्या दोन बंकांसह जवानांनी आग आटो क्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. नेहमी प्रमाणे यावेळी ही या ठिकाणी कोणी ही जबाबदार अधिकारी व सेफ्टी ऑफिर नसल्याने ही दुर्घटना झाल्याचे समजते.

यापूर्वी ही याच कंपनीत आशाच प्रकारे मालक व व्यवस्थापणाच्या निष्काकजीपणामुळे व चुकीच्या कार्यपद्धतीमुळे झालेल्या दुर्घटनेत जवळपास ४६ कामगार त्यांचे डोळे गमावता गमावता वाचले होते.  

"दि. ४ में २०१९ रोजी या कंपनीतील Pocl3 फॉस्परस ऑक्सीक्लोराईड या रसायनाचा रिसाव झाल्याने व यानंतरच्या घ्यावयाच्या काळजी व सुरक्षितते बाबत कोणतीही माहिती नसल्याने व दुर्घटने वेळी या ठिकाणी कोणता ही सक्षम / जबाबदार अधिकारी नसल्याने चुकीच्या पद्धतिने हाताळनी झाल्याने या कंपनीत कामावर असलेल्या ४६ कामगारांच्या डोळांना इजा झाली होती. त्यांना उपचारार्थ परिसरातील विविध हॉस्पिटलांमधे दाखल करण्यात आले होते." आजच्या दुर्घटनेत १) निलेश बोरसे, २८ हा ९०% भाजला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास बर्न हॉस्पिटल नवी मुंबई येथे उपाचार्थ रेफर करण्यात आले आहे. तर २) महेंद धांडे, ४५ यास तुंगा हॉस्पिटल मधे उपचार्थ दाखल केले आहे. तिसर्‍या जखमी बाबत अध्याप कोणती ही माहिती उपल्बध नाही. या बाबत कंपनी व्यवस्थापणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही प्रतिसाद दिला नाही. तर घटना स्थळी कोणी ही जबाबदार अधिकारी नसल्याने व्यवस्थापणाने प्रसारमाध्यमांना घटना स्थळी जाऊ न देण्यास व कोणतीही माहिती देऊ नये असे सांगितले असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांना मज्जाव केल्याने अपघाता बाबत व हानी बाबत साशंकता निर्माण झाली आहे.