केरोसीनचा काळा बाजार करणाऱ्यांकडून बायो डिझलवर डल्ला.

"मनोर पोलीस ठाण्यात ज्वालाग्राही पदार्थ व जिवनावश्यक वस्तु अधिनियामांनुसार गुन्हा दाखल"  

बोईसर: ( BTM न्यूज नेटवर्क) दि.१५, बोईसर येथिल रॉकेल केरोसीन (रॉकेल) चा व्यवासाय करणाऱ्या गणेश खत्री या युवकावर गुजारात राज्यात स्वस्तात मिळणारे बायो डिझेल बेकायदेशीररित्या बोइसर व परिसरात विक्री केले जात असल्याबाबतची माहिती समोर आली आहे. आरोपी विकास खत्री व त्याच्या इतर चार भावांचा बोईसर येथे अनेक वर्षापासून केरोसीन (रॉकेल) चा व्यावसाय असून यांच्याकडून शासकीय अनुदानित रॉकेलचा काळा बाजार केला जात असल्याचे आरोप व तक्रारी नेहमीच होत असतात.
मागील काही दिवसांपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर जबरी चोरी, दरोडा, ऑइल चोरी, अवैद्य माल वाहतुक आशा गुन्हेगारीत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक, पालघर श्री. दत्तात्रय शिंदे यांनी महामार्गावर घडणाऱ्या आशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता महामार्गावर नियमित पोलीस गस्त घालण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी महामार्गावर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असतांना दिनांक १३/१०/२०२० रोजी रात्री २०.१५ वाजताचे सुमारास मौजे आवंढाणी गावचे हद्दीत अहमदाबाद-मुंबई महामार्गावर मुंबई वाहिनीलगतच्या हॉटेल सती माता पॅलेस परीसरात यातील आरोपी क्र.१)मुकेश विरसिंग राऊत, वय २७ वर्षे, याने आरोपी क्र.२)विकास खत्री रा.बोईसर याचे सांगणेवरुन त्याचे ताब्यातील टेंम्पो क्र.एम.एच ०४/इ.एल.५४०८ यामध्ये बायो डीझेल ज्वलनशिल पदार्थाचा साठा विक्री करण्याकरीता विना परवाना आपले कब्जात बाळगुन व साठवणुक करुन मानवी जीवन धोक्यात येईल व ज्वालाग्राही पादार्थाबाबत हयगयीचे वर्तन करुन जिवणावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे तरतुदींचे उल्लंघन करुन वाहतुक करित असताना मिळुन आला. सदर गुन्हयातील आरोपीत यांचे ताब्यातुन १) २८८००/- रुपये किंमतीचे एकुण ४५० लिटर डिझेल, २)३३६००/ रुपये किंमतीचे एकुण ५२५ लिटर डिझेल, ३)१७२८०/-रुपये किंमतीचे एकुण २७० लिटर डिझेल, ४) ४४१६०/- रुपये किंमतीचे ६९० लिटर डिझेल, ५) ४६०८०/-रुपये किंमतीचे एकुण ७२० लिटर डिझेल, ६) १२८००/- रुपये किंमतीचे एकुण २०० लिटर डिझेल, ७) ६४००/ रुपये किंमतीचे एक सफ़ेद रंगाचा प्लॅस्टीकचा चौकोणी बॅरेल लोखंडी ब्रॅकेट मध्ये फ़िटींग केलेले ८) १०,०००/-रुपये किंमतीचे एक निळ्या व सफ़ेद रंगाची पंप मशिन, त्या समोरील बाजुस चौकोणी डिस्ल्पे व त्याखाली किपॅड असलेला लोखंडी ब्रॅकेटमध्ये फ़िटींग केलेली ९) ५००/- एक सुमारे १८.५ फुट लांबीचा काळ्या रंगाचा रबरी पंप असा एकुण १,९९,६२०/- रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन मनोर पोलीस ठाणे गु.र.नं.१७५/२०२० भा.द.वि.सं कलम २८५,३४ सह जिवनावश्य वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७ प्रमाणे, गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चालु आहे. सदरची कारवाई श्री.विकास नाईक, उपविभागिय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, सपोनि/श्री.प्रताप दराडे, प्रभारी अधिकारी मनोर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.