*गरीबांच्या हक्काचं रेशन धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्यांचा संभाजी ब्रिगेड कडून पर्दाफाश*

प्रतिनिधी.जितेंद्र मोरघा
दि.१२ सप्टेंबर २०२०.
        विक्रमगड तालुक्यात गुरुवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व डोलारी बु. येथील ग्रामस्थ यांना दादरा नगर हवेली येथील (DN)पासिंग असलेल्या एका टेंम्पोमध्ये रेशनचं धान्य काळ्या बाजारात जात असल्याचा संशय आल्याने टेंम्पो चालकाची चौकशी केली असता टेंम्पो चालकाने हे धान्य रेशनिंग दुकानावरुन आणल्याची कबुली दिली.ह्या टेम्पोंत शासकिय धान्याचा सरकारी शिक्का असलेल्या १० तांदळाच्या भरलेल्या गोणी व ४ प्लँस्टिक तांदळाच्या गोणी आढळल्या.त्यामुळे हा टेंम्पो संभाजी ब्रिगेडचे पालघर जिल्हाध्यक्ष शिवश्री तेजस भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील टेंम्पो तहसिल  कार्यालयातील अधिकारी यांच्या ताब्यात दिला.दोषींवर सखोल कारवाईसाठी संभाजी ब्रिगेड मार्फत तहसिलदार कार्यालय विक्रमगड व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना संबंधितांवर कारवाईसाठी निवेदन देण्यात आले.
        या निवेदनाची दखल घेऊन विक्रमगड तहसिल कार्यालयामार्फत पंचनामा करण्यात आला असुन विक्रमगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.यावेळी डोल्हारी बु.येथील ग्रामस्थांनी संभाजी ब्रिगेडचे विशेष आभार मानले.
      संभांजी बिग्रेडचे पालघर जिल्हाध्यक्ष शिवश्री तेजस भोईर यांनी यांनी नुकताच ७ सप्टेंबर २०२० ला पदभार स्विकारला आहे.त्यांच्या कडुन रेशन माफियांवर झालेल्या कारवाईने समाजातील सर्व स्तरातुन त्यांच्यावर कौतुक होत आहे.