दि. 11 जुलै 2020, बॉम्बे रेयॉन कामगारांचे काम बंद आंदोलन, दिवस   अकरावा .... विशेष रिपोर्ट 

पावसात भीजत आंदोलन सुरूच सुस्त व मस्त प्रशासन नावाचा उधळलेला घोडा अजू ही झोपेतच... 

प्रशासन व कंपनी मालकाकडून मागील सहा महिन्यांपासून पगार व न्याय मिळत नसल्याने, अखेर 1 जुलै 2020 पासून शेकडो कामगारांनी कंपनीच्या गेटवरती कामबंद आंदोलनास सुरवात केली आहे. 

तारापूर : दि. 10 जुलै, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. बॉम्बे रेयॉन फॉशन लि. या कामगारांचा जानेवारी २०२० पासूनच्या थकित पगाराचा प्रश्न चिघळला असून, मागील तीन महिन्यांपासून पगारासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांना कामावर न घेता इतर काही कामगारांना कामावर बोलावून त्यांना पगार दिल्याने आंदोलन कर्ते कामगारांनी आज दि. 1 जुलै रोजी सकाळी 7 वाजले पासून, कंपनीच्या गेटवरती कामबंद आंदोलनास सुरवात केली आहे. 
             बॉम्बे रेयॉन फॉशन लि. या कंपनीने जानेवारी २०२० पासून त्यांच्या जवळपास 3000 कामगारांना पगारच दिलेला नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत पाच वेळा आंदोलने करून व कंपनी व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ही कामगारांना पगार दिलेला नाही. 
दरम्यान लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जून महिन्यात कंपनीने मालकाने काही मर्जीतल्या कामगारांना त्यांचा पगार देऊन पुन्हा कामावर बोलावून कंपनी सुरू केली व आंदोलन करणाऱ्या कामगारांना पगार ही दिला नाही व कामावरती ही घेतले नाही. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आज सकाळपासून कंपनीच्या गेटवरती कामबंद आंदोलनास सुरवात केली आहे. यात जवळपास 200 हून अधिक महिला कामगारांचा हि समावेश आहे. 

कंपनी मालक कामगारांचे थकित पगार देत नसल्याने आरआरसी रिव्हेन्यू रिकव्हरी प्रमाणपत्र वसुली बाबत मा. जिल्हाधिकारी पालघर यांचा कळवले असताना ही त्याचाकडून अध्याप कोणतीही कारवाई केलेली नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने या पिडीत कामगारांनी अखेर कामबंद आंदोलनास सुरवात केली आहे.

कोरोना सारख्या वैश्विक महामारीत हजारो कामगारांना उपासमारीच्या दरीत ढकलणाऱ्या कंपनी मालकावर गुन्हा दाखल करून कामगारांना न्याय व पगार मिळणार की कागदी घोडे नाचविणारी प्रशासन नावाची भ्रष्ट यंञणा या कामगारांवरच कारवाई करणार हे पाहवे लागेल.