लॉकडाऊनमध्ये बुडत्या उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्लोजरचा फटका. 

तारापूर : दिनांक- 21, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील व पालघर जिल्ह्यातील 30 हून अधिक उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने #कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर चालू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल 2020 पासून आता पर्यंत उत्पादन बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जवळपास 20 उद्योगांचा समावेश आहे. 

सप्टेंबर 2019 ते जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्या दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष सर्वेक्षण पथकाने उद्योगांची तपासणी केली होती. त्यानुसार दोषी आढळून आलेल्या कंपन्यांवर त्याच वेळी कारवाई न करता आता लॉकडाऊनच्या कालावधीतच कारवाईचा बडगा उगारून थेट उत्पादनच बंद करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. या कालावधीत विशेष सर्वेक्षण पथकाने जवळपास 700 पेक्षा आधिक उद्योगांची तपासणी केली होती. 

दरम्यान 13 एप्रिल 2020 रोजी चुकीच्या कार्यपध्दतीमुळे तीघांचा बळी घेणाऱ्या गँलेक्सी सेफ्रिकेंटस कंपनीला माञ सेफ क्लोजर दिले आहे. तर इतर कंपन्यांचा पाणी पुरवठा व विद्युत पुरवाठा बंद करण्याचे आदेश या क्लोजर ऑर्डरमध्ये दिले आहेत. 

एका बाजूला सरकार डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी व मजबूत करण्यासाठी उद्योग सुरू करण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेक कारखाण्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश काडले जात आहेत. 

लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग बंद असल्याने लाखो कामगार व कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेलीआहे. हजारो कामगार व मजूर त्यांचा गावी गेले आहेत. आशात उपलब्ध मनुष्यबळावर उद्योग चालविणीचे आवाहन उभे असतानाच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या कारवाईने, उद्योजकांसमोर मोठे आव्हान व संकट निर्माण झाले आहे. 

यावर सरकार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विचार करावा अन्यथा तारापूर औद्योगिक क्षेत्रातील शेकडो उद्योगांना पुन्हा टाळे लावून उद्योग बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही व पर्यायाने राहिलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना ही बेरोजगार व्हावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

➡ "याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता कोणीही प्रतिक्रिया दिली नाही." 

➡ #कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग बंद होते. यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने आता केंद्र सरकार व राज्य सरकारने कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या सह्याने उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यातील अटी शर्ती बंदच्या कालावधीतील झालेले मोठे अर्थिक नुकसान यामुळे उद्योग सुरु करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आशात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2019 मधील सर्वेच्या आधारावर लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योगांवर कारवाई करण्यास केलेली सुरवात व वेळ चुकीची आहे. यावर सरकारने विचार करायला हवा अन्यथा उद्योग बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. 

श्री. जगन्नाथ भंडारी 
उपाध्यक्ष : Tarapur Industrial Manufacturrs Association (TIMA)

➡ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांनी नियमांचे पालन न केल्याने उद्योगांना क्लोजर नोटिस देण्याची ही योग्य वेळ नाही.

अध्याप सर्व उद्योग व्यवसाय स्थिरावलेले नाहित. त्यामुळे 
क्लोजर मधील सर्व निकष पूर्ण करणे अवघड आहे. एमपीसीबीने एकूण लॉक डाउन संपेपर्यंत उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश व पाणी पुरवठा व विद्युत पुरवाठा बंद करण्याचे आदेश दिले जात आहेत ते न देता सेफ क्लोजर देण्याबाबत विचार करावा आणि वेळ द्यावा.

श्री. दिनेश जसानी 
उद्योजक, तारापूर औद्योगिक क्षेत्र.