हजारो टन वजनाच्या लोखंडी कॉईलसह मजूरांची वाहतूक करणारा ट्रेलर पलटी ... 

"आत्यावश्यक सेवेच्यानावखाली ट्रेलरमधून अवैधरित्या परराज्यात निघालेले 25 मजूर सुदैवाने बचावले"

तारापूर : दि. 10 मे 2020, राञी 9:45 वाजताच्या सुमारास, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अवजड उद्योगातील कॉलची वाहतूक करणारा ट्रेलर क्रमांक MH 48 AY 7648, पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली. 

तसे तर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मुकट टैंक नाका ते मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे जाणाऱ्या बोईसर चिल्हार रोडवर नियमितच कॉल घेऊन जाणारे अवजड ट्रेलर पलटी होत असतात. 

दि. 10 रोजी राञी पलटी झालेल्या या ट्रेलरमध्ये जवळपास 25 मजूर असल्याने सर्वञ एकच खळबळ उडाली होती. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी वा कोणी ही जखमी झाले नाही. आत्यावश्यक सेवेचा परवाना असलेल्या या ट्रेलरमध्ये मजूर बसविलेले असल्याने हा ट्रेलर अतीशय वेगात असल्याने मुकट टैंक नाक्यावरिल वळणावर ट्रेलर पलटी झाला, याच दरम्यान यातील सर्व मजूरांनी व ड्राइवरने लागलीच पळ काढल्याचे प्रत्यक्ष दर्शिंनी सांगितले.

टेलर पलटी झाला त्यावेळी ट्रेलरच्या कँबीनमध्ये अडकलेल्या काही मजूरांना प्रत्यक्षदर्शींपैकी काहींनी बाहेर काढले असल्याचे सांगितले तर त्यांना काही दुखापत वगैरे झाली आहे का याबाबत चौकशी करत असतानाच त्यांनी ही तिथून पळ काढल्याचे समजते, हा अवजड वाहतूक करणारा ट्रेलर कलकत्ता रोड लाईन या कंपनीचा असल्याची समजते. 

या घटेनेची माहिती मिळताच बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते परंतु ड्राइवरसह सर्व जणांनी पळ काढल्याने याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. 
पुढिल तपास बोईसर पोलीस करित आहेत. 

लॉकडाऊन चालू झाल्यापासून मुंबई व मुंबई उपनगरातील व ठाणे, पनवेल व राज्याच्या इतर भागातून अनेक जण आशा प्रकारे आत्यावश्यक सेवांचे परवाने असलेल्या मालवाहू वाहनांमधून बोईसर व परिसरात दाखल होत आहेत व बोईसर मधून इतर भागात जात आहेत. याबाबत प्रशासनासकडे अनेक व्यक्ती व संस्थांनी तक्रारी देऊन ही जानिवपूर्वक योग्य उपाय योजना व कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत आहे. 

आशा प्रकारे अवजड लोखंडी कॉईलची वाहतूक तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफ़ाइल लि, जेएसडब्लू स्टिल कोटेड प्रोडेक्टस लि. (जिंदल) व टाटा स्टिल उद्योगांसाठी केली जाते. तर टाटा स्टिल लॉकडाऊनच्या सुरवातीपासूनच बंद आहे. विराज व जिंदल कंपनीने त्यांचे उद्योग जिल्हाधिकारी पालघर यांचा परवानगीने चालू ठेवले आहेत. याबाबत बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

या अपघतात काही किरकोळ जखमी झाले  असल्याची शंका प्रत्यक्ष दर्शीनी वर्तवली आहे.
आशाच महत्वपूर्ण माहिती व बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेजला Like, Share व Follow करा ... 
आपल्या ही काही सुचना, समस्या व महत्वपूर्ण माहिती द्यावयाची असल्यास वरिल संपर्क नंबर वर व्हॉटस् अप करा, योग्यत्या प्रकरणी खाञीलायक असल्यास प्रसिद्धी देण्यात येईल. 
धन्यवाद!