समाजकंटकांकडून परप्रांतिय मजूरांची अर्थिक लुट व फसवणूक ... 

"3000 ते 4000 प्रत्येकी एका ट्रकमधे 60 हून अधिक मजूर" 

"तीन दिवसांपूर्वी गेलेल्या तीन ते चार ट्रक भरून गेलेल्या मजूर, ट्रक ड्राइवर व दलालास उत्तर प्रदेशच्या सिमेवर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती" 

दरम्यान आज दि. 8 रोजी, राञी, या दलालांचा हजारो मजूरांना 5 ते 6 ट्रक मधून उत्तर प्रदेश येथे  पाठविण्याचा डाव बोईसर एमआयडीसी पोलीसांनी उधळून लावला ... 

बोईसर : दि. 8 में 2020, लाखो कामगारांच्या हालाखीच्या परिस्थितिचा फायदा घेत बोईसर अवधनगर येथिल काही लालची दलालांनी पर प्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचविण्याचे अमिष दाखवत त्यांच्याकडून प्रत्येकी 3000 ते 4000 रुपये इतकी मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले असून, आशा प्रकारे बेकायदेशिरपणे शासनाची कोणतीही परवानगी न घेता मालवाहक ट्रक मधून या मजूरांना राञीचा प्रवास करवत त्यांचा व इतर लोकांचा ही जीव धोक्यात टाकत अवधनगर येथिल काही दलालांनी दिनांक- 5 मे 2020 रोजी राञी 3 ते 4 ट्रक मधून जवळपास 350 ते 400 मजूर व त्यांच्या परिवाराची बेकायदेशिरपणे वाहतूक करत त्यांना उत्तर प्रदेश येथे घेऊन गेले असताना, काल दि. 7 मे 2020 रोजी त्यांना उत्तर प्रदेशच्या सिमावरती पकडण्यात आले असून, याबाबत चौकशी चालू असल्याचे विश्वासनिय सुञांकडून माहिती समोर आली आहे. 

दरम्यान आज दिनांक 8 मे 2020 रोजी बोईसर येथिल अवधनगर येथून दोन ट्रक, मान वारांगडे व हायवे वरून 6 ट्रक असे हजारो मजूर व त्यांच्या परिवारस घेऊन जाणार असल्याची माहिती बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदिप कसबे यांना मिमिळाल्यानंतर त्यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग बोईसर, श्री. वळवी, सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटिल व इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत या सर्व ठिकाणी पोचून या कामगारांचे प्रबोधन करत प्रशासन त्यांच्या जाण्याची योग्य सोय करत असून, उद्या दिनांक 9 मे 2020 रोजी बोईसर येथून उत्तर प्रदेशसाठी रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती देत,  कोऩी ही गैर प्रकारे वा पायी गावी जाण्याचा प्रयत्न करू नये व फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा असे आवाहन केले आहे.  

या सर्व गैर प्रकारामुळे व दुर्घटना होऊन अनेक मजूरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आशा प्रकारे बेकायदेशिरपणे मजूरांची वाहतूक करून त्यांची अर्थिक लूट करून #कोरोना वाढिच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदीचे उलंघन करून स्वत:च्या अर्थिक फायद्यासाठी प्रशासन, महाराष्ट्र सरकार व संपूर्ण यंञणेस वेठिस धरूण हजारो मजूरांचा जीव धोक्यात टाकून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या समाजकंट व दलालांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. 

गजानन मोहिते 
संपादक: बोईसर तारापूर मिञ 
9322796862
आशाच महत्वपूर्ण माहिती व बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेजला Like, Share व Follow करा ... 
आपल्या ही काही सुचना, समस्या व महत्वपूर्ण माहिती द्यावयाची असल्यास वरिल संपर्क नंबर वर व्हॉटस् अप करा, योग्यत्या प्रकरणी खाञीलायक असल्यास प्रसिद्धी देण्यात येईल. 
धन्यवाद!