दारू पिण्याच्या वादातून एकाची हत्या 

बोईसर : दि. 7, बोईसर पालघर रोड वरिल यशवंत सृष्टि समोर काल दि. 6 रोजी दारू पिण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीत रामविलास राजभर पुण व जगदेश राजभर पुण यांच्यात दुपारी दारू पिण्यावरून वाद झाला होता. याचा मनात राग धरून रामविलास राजभर पुण याने सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जगदेश याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान जगदेश यास बोईसर ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता राञी 10.30 वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

यशवंत सृष्टि समोर राजेश टायरवाला याचे टायर सर्व्हिसचे दुकान असून त्यालगतच चहाची टपरी आहे. याच ठिकाणी एमआयडीसीच्या जागेत ट्रक टर्मिनल असून अनेक ट्रक पार्किंग केलेले असतात व ट्रक ड्राइवर व त्यांचे इतर सहकारी याच ठिकाणी जेवण बनवने राहणे नशा इत्यादी चालू असते काल दुपारी बाराच्या सुमारास या दोघांसह अन्य इतर तीन ते चार जणांनी वाईन शॉप मधून  आणलेली दारू पिण्यावरून वाद झाला होता. 

याचाच राग मनात धरून रामविलासने सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जगदेश हा याठिकाणी बंद असलेल्या चहा टपरीवर बसला असता त्याच्यावर हल्ला केला यात गंभीर जखमी झालेल्या जगदेशचा राञी उपचारा दरम्यान मृत्यु झाला. 

बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, पुढिल तपास सुरू आहे. 

दरम्यान अध्याप कोणास ही अटक करण्यात आलेली 
नाही. 

आशाच महत्वपूर्ण माहिती व बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेजला Like, Share व Follow करा ... 
आपल्या ही काही सुचना, समस्या व महत्वपूर्ण माहिती द्यावयाची असल्यास वरिल संपर्क नंबर वर व्हॉटस् अप करा, योग्यत्या प्रकरणी खाञीलायक असल्यास प्रसिद्धी देण्यात येईल. 
धन्यवाद!