दोन साधू व त्यांच्या चालकाची हत्या करणाऱ्या जमावातील एक कोरोना बाधित ... 

पालघर : दि. 2, पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दितील गडचिंचले येथे दि. 16 एप्रिल रोजी, झालेल्या दोन साधूं व त्यांच्या चालकाच्या हत्याकांडातील 400 ते 500 च्या जमावा पैकी प्रथम 110 व नंतर 5 असे 115 जणांना अटक करण्यात आलेली आहे. यापैकी एका आरोपीला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न आहे. 

या आरोपीसह अन्य 20 आरोपींचा ताबा वाडा पोलीस स्टेशनकडे आहे. या सहवासातील हे २० सहआरोपी आणि २३ पोलीस कर्मचारी यांचे अलगीकरण करण्यात आले असून, यांच्या घशाचे नमुने घेण्यात आले आहेत. 

16 एप्रिल रोजीच्या 110 आरोपींपैकी 22 आरोपींना वाडा येथे पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. 18 एप्रिल रोजी करण्यात आलेली या सर्व आरोपींची करोना तपासणी निगेटिव्ह आली होती. 

दरम्यान, काल दि 1 में रोजी, राञी या आरोपींचे व्दितिय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यापैकी एका 55 वर्षीय आरोपीचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने त्यास करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे या आरोपीला करोनाबाबतची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती, तरी ही त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. 

या आरोपीच्या संपर्कात असलेले, अन्य 20 सहआरोपी व 23 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या घशाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या सर्व आरोपींच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यासाठी डहाणू येथील आरोग्य पथक रवाना करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

30 एप्रिल रोजी, या सर्व 22 आरोपींना डहाणू न्यायालयात एकत्रितरित्या आणण्यात आले होते. यातील एका आरोपीस करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासना समोर मोठे आव्हान व चिंता आहे. 

तर आजू बाजूच्या गावांसह फरार 400 ते 500 आरोपी व त्यांच्या संपर्कातील लोकांबाबत ही चिंतेची बाब आहे?