*#कोरोना पॉजिटिव्ह पार्श्वभूमिवर संपूर्ण बोईसर सिल* ... "माञ प्रशासन गंभीर नसल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये ही सुरक्षिततेच्या दृष्टिने ग्रामपंचायतींकडून सक्तीचे लॉकडाऊन" बोईसर : दि. 27, बोईसर ग्रामपंचायत हद्दितील बोईसर तारापूर रोडलगत असलेल्या दलाल टावर येथिल सरस्वती अपार्टमेंट मधील डेनिअल सुधाकर ञिभिवन हा 35 वर्षीय इसम कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने संपूर्ण बोईसर सिल केलाचा आदेश पारित केलेला आहे. माञ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशावरून, *तहसिलदार पालघर यांनी काढलेल्या या आदेशावर त्यांची सहिच केलेली नसल्याने हा आदेश लागू होत नसल्याचे* खुद बोईसर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व याच आदेशात ज्यांची कोरोना समितीमधे सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्या कमलेश संखे यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती व संभ्रम अवस्था निर्माण झाली असून, जिल्हाधिकारी, तहसिलदार व जिल्हा प्रशासन याबाबत अजून ही गंभीर का नाहीत ? असा प्रश्न विचारला जात आहे. माञ या सर्व गंभीर प्रकारामुळे बोईसर व आजूबाजूच्या परिसरातील बेटेगाव, सरावली, सालवड, पास्थळ, पाम, नवापूर इत्यादी गावां मधील *ग्रामपंचायतींनी स्वत: हून संपूर्ण गाव 100 % बंद ठेवण्याचे निर्णय* घेतले आहेत. बोईसर व परिसरातील अनेक गावांमध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने याठिकाणी *लोक संखेची घनता सर्वाधिक* असताना ही याठिकाणी उद्योग चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी काही उद्योगजकांशी केलेल्या हात मिळवणीमुळे जानिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप वारंवार होत असताना व याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रारी देऊन ही काहीच कारवाई वा सुधारणा करण्यात आलेली नसल्याचे आरोप वारंवार होत आहेत. दरम्यान या ठिकाणच्या विराज प्रोफ़ाइल लि., जिंदल स्टिल या सारख्या अवजड उद्योगांमध्ये हजारो कामगार काम करत असून, याठिकाणी व इतर सर्वच कंपन्यांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकार व राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने घातलेल्या नियम व निर्बंधांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही जिल्हाधिकारी पालघर यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. या व आशा कंपन्यांनामधील माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दररोज अनेक जण मुंबई व मुंबई उपनगरातील व परिसरातील हॉटस्पॉट असलेल्या क्षेञातून बोईसर मधे दाखल होत आहेत. तसेच या कंपन्यांमध्ये कामावर येणारे बहुतांश कामगार ही बाहेरून येत आहेत. *हजारो कामगार दुचाकीवरून (मोटार सायकल, प्रायव्हेट कार व बस) ये-जा करत असल्याने रोडवरती नेहमी प्रमाणे वर्दळ असते*. आशा कामगारांसाठी कंपनीने कंपनीच्या आत निवासी व्यवस्था करण्याचे निर्बंध असताना ही सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवत रोज या कामगारांची वाहतूक होत आहे. याकडे प्रशासनान व उद्योजक जानिवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याने आता आजू बाजूच्या गांवामध्ये आशा लोकांवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनिय सुञांकडून समोर आली आहे. यामुळे आता बोईसर व परिसरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान जवळपास तीन लाखाहून अधिक लोक विशेषता कामगार वर्ग राहत असलेल्या बोईसर व तारापूर औद्योगिक परिसरासतील, कारखाण्यांना चालू करण्याबाबत परवानगी देताना व नियमांचे उलंघन केल्यानंतर ही हितसंबंधामुळे #कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा ही या भागास प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. असाच काहीसा प्रकार जिल्ह्याच्या इतर भागातील परिस्थिती ही काहीशी अशीच असल्याने, काही ठिकाणी हितसंबंधामुळे व काही ठिकाणी "ऊँटावरूण शेळ्या राखण्याच्या" प्रकारामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यात जिल्हाधिकारी श्री. कैलाश शिंदे हे अपयशी ठरत आहेत ? तर जिल्हातील कोरोनामुळे कौलाशवासी होणाऱ्यांचा आकडा शेकडा पूर्ण करत नाही, तो पर्यंत सरकार, भ्रष्ट राजकीय नेते, लालची प्रशासकीय अधिकारी व उद्योजकांना अक्कल येणार नाही का ? की जनतेनेच कायदा हातात घ्यायची वेळ आणली जाणार ? गजानन मोहिते संपादक : बोईसर तारापूर मिञ 9322796862