बोईसरमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ. 

अति जोखमीच्या सहवासातील 10 हून अधिक 


बोईसर : दि. 26, बोईसर दलाल टावर येथिल एका 35 वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
या इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यास पालघर ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

या इसमाचे जवळचे नातेवाईक मुंबई येथे उपचारार्थ दाखल असल्याने त्याने अनेक वेळा बोईसर ते मुंबई व मुंबई ते बोईसर असा प्रवास केला असल्याचे समजते. 

याच्या संपर्कात अजून 10 पेक्षा आधिक लोक असल्याची माहिती समोर येत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र व बोईसर हा परिसरात लोकसंखेची घनता अधिक असून याठिकाणी वारंवार लॉकडाऊनचे व सोशल डिस्टंसिंगचे उलंघन होत आहे. तर औद्यौगिक क्षेञातील अनेक कंपन्यांचालू असल्याने या कंपन्यांना आवश्यकता असलेल्या मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना मधून मुंबई व परिसरातील अनेक लोक बोईसर मधे दाखल होत असल्याबाबतची अनेक वेळा माहिती देऊन व बातम्या प्रसिध्द होऊन ही प्रशासनाने व लोकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. 

बोईसरमधे एक ही कोरोना रुग्ण नव्हता परंतु मुंबई व मुंबई उपनगरातील बोहेरून ये-जा करणाऱ्यांवर कोणतीही प्रतिबंध नसल्याने व प्रथम नव्याने सापडलेल्या या कोरोना रुग्णामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या रुग्णाला मुंबईतच कोरोना संसर्ग झाला शक्यता असल्याचे समजते. 

या घटनेनंतर तरी प्रशासन बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात व परिसरातील परिस्थितिवर गांभीर्याने लक्ष देणार का ? की मुठभर उद्योजकांसाठी लाखो लोकांचा जीव धोक्यात टाकणार आहे ? 

जोखमीच्या संपर्कातील संशियीतांची संख्यावाढून आकडा मोठा होण्याची शक्यता?
हा इसम बोईसर दलाल टावर येथिल हरिद्वार गार्डन सोसायटी मधील रहिवाशी असल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून,या संकुलातील व सरस्वती इमारतीतील कोरोनाच्या सुरक्षितते मूळे कोणीही व्यक्तीने आपल्या घरातून व इमारतीतून दरवाज्याच्या बाहेर पडू नये. दरवाजे, खिडक्या सर्वांनी बंद करून ठेवाव्यात व त्यांना लागणारे किराणा सामान, भाजीपाला हे ग्रामपंचायतीस कळवले जाईल आणि हे सामान त्यांच्या संकुलाच्या पहिल्या इमारतीच्या पुढे ठेवण्यात येईल व तेथूनच प्रत्येकाने घ्यायचे आहे. ही सूचना पुढील शासकीय आदेश येई पर्यंत सर्वांना बंधनकारक राहील, असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.