#कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हातील शेकडो उद्योजकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह ?

"पालघर, बोईसर व तारापूरचा समावेश MUMBAI METROPOLITAN REGION (MMR) मध्ये  होत असल्याने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, ESSENTIAL COMMODITIES AND SERVICS, Continues prosses units. (जीवन आवश्यक व आत्यावश्यक सेवांचे उत्पादना व्यतीरिक्त) इतर उद्योग बंदच राहणार आहेत. असे असताना ही तारापूर औद्योगिक क्षेत्रातील व परिसरातील काही अवजड उद्योगांवर जिल्हाधिकारी पालघर यांनी विशेष मेहरबानी दाखवत त्यांना उद्योग चालू करण्यासाठी परवानगी दिली असल्याने, आता शेकडो उद्योजकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे ?"

तारापूर : BTM ऩ्यूज नेटवर्क - दि. 24, केंद्र सरकारच्या दि. 15 रोजीचा उद्योग चालू करण्याबाबतचा आध्यादेश,  जिल्हाधिकारी पालघर यांचे दि. 16 रोजीचे पालघर जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या नावे काढलेले पञ,   Tarapur industrial manufacturers association (TIMA टिमा) अध्यक्षांच्या दि. 17 रोजीच्या उद्योग सुरू करण्यासाठीच्या आणि दि. 20 रोजी उद्योग सुरु न करण्याबाबतच्या मेसेज नंतर शेकडो उद्योजकांचे अर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. दरम्यान #कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर पालघर जिल्हा रेड कॉटेगरीत समाविष्ट झाल्याने व तारापूर औद्योगिक क्षेत्राचा समावेश MMR मध्ये होत, असल्याने याठिकाणाचे ESSENTIAL COMMODITIES AND SERVICS, Continues prosses units. (जीवन आवश्यक व आत्यावश्यक सेवांचे उत्पादना व्यतीरिक्त) इतर उद्योग बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकार व राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने दिलेले असताना ही तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अवजड उद्योगांवर विशेष मेहरबानी दाखवत त्यांना उद्योग चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी परवानगी दिली असल्याने औद्योगिक क्षेत्रात अनेक उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में विराज प्रोफ़ाइल लि. या कंपनीच्या फक्त मुख्य प्लांट प्लाट नंबर जी -1, हा एकच प्लांट Continues prosses units. असून औद्योगिक विकास महामंडळाने फक्त हा एकच प्लांट चालू ठेवण्यासाठी अहवाल दिला असताना ही या कंपनीचे बेबिट्झ फेंल्ज वर्क्स सरावली, विराज प्रोफाईल लि. SRM प्लांट मान, वारांगडे व एमआयडीसीतील जी -1, व्यतीरिक्त इतर सर्वच प्लॉन्ट चालू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी पालघर यांनी कशी दिली ? असा प्रश्न शेकडो उद्योजक विचारत आहेत.

या ठिकाणच्या में. जे एस डब्ल्यू स्टिल कोटेड प्रोडेक्टस लि. (जिंदल) या कंपनीस ही प्रथम फुड पॉकिंगसाठी लागणारा पञा बनवीत असल्याने हा जीवन आवश्यक वस्तु मध्ये समाविष्ट होत असल्याने फक्त हाच प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता जिंदल कंपनीचे, पिकलिंग व कलर कोटिंगसह इतर सर्वच प्लॉन्ट चालू झाले आहेत. यांना परवानगी कशी दिली ?

करमतारा इंजिनिअरिंग ही चालूच आहे ?

असे अनेक उद्योग चालू आहेत. ज्यांचा समावेश / संबंध ESSENTIAL COMMODITIES AND SERVICS, Continues prosses units. (जीवन आवश्यक व आत्यावश्यक सेवांचे उत्पादनाशी) नाही.

या सर्व उद्योगांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगार / कर्मचाऱी / अधिकाऱी यांचे पैकी बहुतांश लोक कोरोनाचा प्रादुर्भाव / हॉटस्पॉट असलेल्या क्षेञातून अपडाऊन करतात, यांची  #कोरोना तपासणी करण्यात आलेली नाही. कामाच्या ठिकाणी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने #कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर घातलेल्या नियम व निर्बंधांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले असताना ही त्यांचेवर गुन्हे दाखल न करता फक्त दोनच दिवसांसाठी उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले व पुन्हा लगेच चालू करण्याची परवानगी देण्यात आली.

या सर्व प्रकारामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योजकांसह जिल्ह्याच्या अन्य औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भूमिकेवर व कार्य पध्दतिवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या सर्व गैर प्रकारामुळे बोईसर व परिसरात लॉकडाऊनचे नियम व निर्बंधांचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे. तर सोशल डिस्टंसिंगचे ही बारा वाजवले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येणार की नेहमी प्रमाणे एखाद्या गोष्टिच्या अमलबजावणीसाठी बळी जाण्याची वाट पाहिली जाते तसेच काही होण्याची वाट पाहिली जात नाही ना ? हे पहावे लागेल.