#कोरोना, टिमा अध्यक्षांच्या चुकीच्या मेसेजमुळे लॉकडाऊन व कोरोनाचे नियम व निर्बंध पायदळी ... 

|| टिमा अध्यक्ष डि के राऊत व सेक्रेटरी गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची अनेक उद्योजकांची मागणी ||

"अनेक उद्योजक मुंबई व परिसरातील कोरोना हॉटस्पॉट व लॉकडाऊन तोडून उद्योग सुरू करण्यासाठी तारापूरात, हजारो कामगारांना कामावर बोलावून पुन्हा घरी जावे लागल्याने कोरोनाचे नियम व निर्बंधांसह सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजल्याचे चिञ, पोलीसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न" 

तारापूर : BTM ऩ्यूज नेटवर्क - दि. 20, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्वच उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी परवानगी दिली असल्याने व आपली जिल्हाधिकारी यांचाशी चर्च्या झाल्याचा मेसेज व्हॉटस्अपव्दारे टिमाचे अध्यक्ष डि के राऊत यांनी दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी व्हायरल केल्याने आज दिनांक 20 रोजी बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात मुंबई व परिसरातून (कोरोना हॉटस्पॉट) असलेल्या भागातून अनेक उद्योजक उद्योग चालू करण्यासाठी तारापूरात दाखल झाल्याने व या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना कामावर बोलावून घेतल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार आणि आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर घातलेल्या नियम व निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता व उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर व प्रशासनाने कोणतेही आदेश दिलेले नसताना ही टिमा अध्यक्षांच्या दि. 17 रोजीच्या व्हॉटस्अपवरिल मेसेजमुळे, अनेक उद्योजकांकडून व कामगारांकडून लॉकडाऊनचे व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उलंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान या चुकीच्या मेसेजमुळे अनेक उद्योजकांनी बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे धाव घेतल्याचे समजते, याबाबत टिमा अध्यक्ष डि. के. राऊत  व सेक्रेटरी गुप्ता हे समाधान कारक उत्तर देऊ शकले नसल्याने अनेक उद्योजकांनी त्यांची फसवणूक व खोटा मेसेज व्हायरल करून अफवा पसरल्यामुळे कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका व लॉकडाऊनचे नियम व निर्बंधांचे पालन न केल्याने या उद्योजकांवर व कामगारांवर कारवाई झाली असती, पालघर जिल्हा कोरोनाच्या रेड कॉटेगरीत असताना शासनाकडून उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी आदेश दिलेले नसताना ही टिमा अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी दिलेल्या पञामुळे पोलीस यंञणेसह सर्वांचीच फसवणूक करत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जीवन धोक्यात टाकल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी उद्योजकच करित आहेत. 

कोरोना विष्णुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर व पालघर जिल्हा रेड कॉटेगरीत समाविष्ट असताना तथा जिल्हाधिकारी पालघर व शासनाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नसताना ही उद्योग सुरू करण्यासाठीचा चुकिचा मेसेज व अफवा पुरवणाऱ्या या सर्व प्रकारावर व जांनी जांनी जीवन आवश्यक वा आत्यावश्यक सेवांचे उत्पादनाशी काही ही संबंध नसताना उद्योग चालू केले आहेत. यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.