लॉकडाऊन तोडून मुंबई व परिसरातील अनेक जण बोईसरकडे 

"आध्याप बोईसर तारापूर परिसरात एक ही कोरोना रुग्ण नाही परंतु अवैधरित्या मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातून अवैधरित्या प्रवास करून मागील चार दिवसात 5 जन दाखल झाल्याने धोका." 

बोईसर : दि. 14, मागील चार दिवसांपासून मुंबई व परिसरातून अवैधरित्या प्रवास करून 5 जन बोईसर मध्ये दाखल आले आहेत. बोईसर तारापूर हा औद्योगिक परिसर असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर प्रांतीय राहत आहेत. यांचेच अनेक नातेवाईक, मिञ, गाववाले याना त्या नात्याने ओळखीचा फायदा व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भीतीने अवैधरित्या प्रवास करत, लॉकडाऊनचे नियम तोडत, स्वत:चे व इतरांच्या आरोग्यास व जीवनास धोक्यात टाकत बोईसरकडे येत आहेत. यामुळे बोईसर व परिसरातील मधील लोकांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, लॉकडाऊन तोडून, ज्या कंपनीचे उत्पादन आत्यावश्यक सेवा मध्ये आहे. आशा कंपन्या माल पुरवठा करणाऱ्या ट्रक मधून, मोटार सायकल वरून व महार्गावरून चालत याना त्या मार्गाने येत असल्याने धोका वाढत आहे. 
            दरम्यान या 5 ही जनांची वैद्यकिय तपासणी करून त्यांना कोरेंटाईन करण्यात आले आहे. 

संचार बंदी, लॉकडाऊन, नाक्या नाक्यावर तपासणी मोहिम चालू असताना ही हे लोक गैर प्रकारे बोईसर मधे येत असल्याने, सध्या या 5 जणांचीच माहिती प्रशासनास आहे. माञ असे किती लोक बोईसर व परिसरात आलेले आहेत व येत आहेत याचा शोध घेणे व माहिती मिळणे अवघड होत आहे.