अखेर विराज उद्योग समूहाच्या सर्व प्लांटचे उत्पादन बंद करण्याचे आदेश "कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर शासनाची फसवणूक करत हजारो कामगारांच्या व परिसरातील लाखो लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या में. विराज उद्योग समूहाचे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील व परिसरातील सर्व प्लांट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पालघर यांनी आज दिले आहेत." बोईसर : दि. 10, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक नसणाऱ्या सर्व प्रकारच्या Continuous Process असणारे उद्योग बंद करण्याबाबत शासनाने दि.२४/०३/२०२० रोजी काढलेल्या आदेशापासून ७२ तासात असे उद्योग बंद करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने अधिसुचित केले होते. परंतु Continuous Process असणारे उद्योगधंदे हे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांची मान्यता घेऊन सुरु ठेवण्याची तरतुद असल्याने, असे उद्योग सुरु ठेवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करणे गरजेचे आहे. अशा अर्जाबाबत जिल्हादंडाधिकारी हे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सल्लामसलती नंतर परवानगी देतात. यानंतर उत्पादन सुरु ठेवता येते. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. विराज प्रोफाईल लि. या कंपनीचे उत्पादन हे Continuous Process Plant या प्रकारात मोडते असल्याचे सांगत या कंपनीने त्यांचे सर्व प्लांट चालू ठेवले होते. तर 1219 हून अधिक कामगार कामावर आहेत. या गैर प्रकारावर शासनाकडे व जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी पालघर यांनी, विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र शासन यांनी ई-मेल द्वारे Continuous Process असणाऱ्या उद्योगांना परवानगी घेण्याबाबत निश्चित केलेल्या कार्यपध्दती प्रमाणे विराज प्रोफाईल लि. कंपनीस On-line अर्ज करण्यास कळविले होते. परंतु या कंपनीने अध्याप On-line अर्ज न करता दि. २५/०३/२०२० रोजी दिलेल्या Lockdown आदेश व दि. ०३/०४/२०२० रोजी महाराष्ट्र शासनाने Explanation / Clarification नुसार दि. २५/०३/२०२० रोजीच्या आदेशातील ८(a) व ८(b) मध्ये मोडणाच्या उद्योगधंदयांना परवानगीची आवश्यकता नसल्याने कंपनीचे उत्पादन हे Continuous process plant असल्यामुळे आपण उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवत असल्याचे सांगीतले होते. परंतु करोना (कोव्हीड-१९) विषाणुचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी वेळोवेळी दिलेले आदेश/मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे हे या कंपनीवर बंधनकारक असताना ही जानिवपूर्वक दुर्लक्ष करित व हजारो कामगारांसह परिसरातील लाखो लोकांच्या जीवीताशी धोका निर्माण होण्याची शक्यता असताना ही निष्काळजीपणाने उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली होती. दरम्यान या कंपनीने कमीत कमी कामगार संख्या, Social distancing. मधील तरतुदीनुसार (such as painting of foot marks of distances of 3 feet from each other near check out counter, proper Sanitation in their premises, ensure availability of hand sanitizers/hand washing facilities, appointment of doctors for daily check up of worker/staff, and their record) व इतर उपाययोजना करणे कंपनीवर बंधनकारक असताना ही तसे केले नसल्याचे व कंपनीने करोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना न करता,व केलेल्या उपाययोजनांचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे प्राप्त तक्रारीवरून, जिल्हाधिकारी पालघर यांनी कामगार उप आयुक्त, पालघर यांनी त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत विराज कंपनीच्या चारही युनिटची पाहणी करून सविस्तर दिलेल्या अहवालानुसार, तसेच Lockdown बाबत जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या समितीने दि.०८/०४/२०२० व ०९/०४/२०२० रोजी, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या केलेल्या अहवालांनुसार विराज कंपनीने जानिवपूर्वक, १) हात धुण्यासाठी प्रत्येक कामगारास साबण उपलब्ध न करून देणे, तसेच कॅन्टीनमध्ये हात धुण्याच्या जागेजवळ साबण, हॅन्डवॉश पुरेशा प्रमाणात न ठेवणे. २) स्टाफच्या आसन व्यवस्थेमधील किमान अंतर कमी. ३) Social distancing बाबत प्रवेशद्वार व हजेरी कॉउन्टरवर लावलेल्या फूट मार्कची अंमलबजावणी होत न करणे, Check Out Counter येथे Foot Marking नाही. मुख्य प्रवेश द्वाराजवळ, Check-in आणि Check-out च्या ठिकाणी Waiting Footmarks नाही. ४) दररोज तपासणी केलेल्या कामगार / स्टाफच्या नॉंदी टेवलेल्या नाहीत, ५) कॅन्टीन व हॉस्टेल परिसरात ठिकठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणे व प्रसार रोखण्याबाबत पोस्टर्स लावण्यात आलेली नाहीत. ६) एकुण ६९५१ कर्मचान्यापैकी १२११ कर्मचारी कामावर आहेत. त्यांच्या उपस्थितीबाबत बायोमेट्रीक पध्दत अजुनही सुरु आहे. ७) कंपनीमध्ये काम करणान्या कर्मचान्यांच्या वाहतकीसाठी ११ बसेस पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये Social distancing कशाप्रकारे केली जाते हे स्पष्ट होत नाही.. ८) हॉस्टेल प्रवेशद्वारावर Turn Stile बसविण्यात आल्या आहेत. कामगार/कर्मचारी प्रवेश करतेवेळी त्याचा रणर्श होत आहे. लॉकडाऊन मधून वगळण्यात आलेल्या औद्योगिक आस्थापनांनी राज्य सरकारने तसेच शासनाच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक असताना ही, शासनाने दिलेल्या वेगवेगळया निर्देशांचे / आदेशांचे पालन न करताच विराज कंपनीत उत्पादन प्रक्रिया सुरु असल्याचे निष्पन्न झाल्याने, विराज प्रोफाईल्स प्रा.लि. तारापूर या कंपनीने केंद्र शासन व राज्य शासन यांनी कोरोना विषाणुमुळे (Covid-१९) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी देण्यात आलेले आदेश/निर्देश, नियमामार्गदर्शक सुचना यांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करता या नियमांचे उल्लंघन करत किमान मनुष्यबळाचा (Bare Minimum) वापर न करता उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवून, केंद्रा व राज्य सरकार यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन या कंपनीने उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने अखेर आज दिनांक 10 एप्रिल 2020 रोजी, मा. जिल्हाधिकारी पालघर यांनी महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपायायोजना नियम २०२०, साथीचा रोग कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार मे.विराज प्रोफाईल्स प्रा.लि.तारापूर या कंपनीचे १) प्लान्ट नं. G-२, G -१/२, G-१/३, G - १/४ (SMS२-WRM-WIRE), २) प्लान्ट नं. G-७५, ७६, ७७ (Forging), ३) S.N.२५ (१), (२), (३) मान (S.R.M), व ४) S.N.११०, १११, ११२ महागाव (Fastener) येथील उत्पादन प्रक्रिया बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदिर्घ कालावधीपासूनच्या पाठपुराव्यानंतर आता या आदेशाच्या अमलबजावणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.