BTM ऩ्यूज मराठी: पालघर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी जिल्हाधिकारी पालघर यांचेकडून आज राञी पासून जिल्हात सक्तीचे #Knockdown आज दिवसभरात मुंबई व परिसरात 69 नवीन रुग्ण, महाराष्ट्रतील एकुण कोरोना रुग्णांची संख्या 315 वर पालघर : दि. 31, पालघर ग्रामिण रुग्णालयात कोरोनाच्या प्रादुर्भावाने ग्रस्त सफाळे जवळील उसरणी ता. जि. पालघर येथिल 50 वर्षीय पुरूषास दि. 28 मार्च 2020 रोजी पालघर जिल्हा ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आजच त्यांच्या घशातील नमुन्यांचे अहवाल पॉजिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले होते. आज उपचारा दरम्यान सांयकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांच्या मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान सदरचा इसम ठाणे या ठिकाणी एका कंपनीत कामास होता. शासनाने Lnockdown ची घोषणा केल्यानंतर तो आपल्या घरी परतला होता. दि. 28 मार्च 2020 पूर्वी त्याने सफाळे येथिल पार्थ हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी भेट दिल्याचे समजले आहे. हा इसम ठाणे वागळे इस्टेट येथिल एका कंपनीत कामाला होता. 17 तारखेला पालघर जिल्ह्यातील आपल्या गावी आला होता. याच्या संपर्कात आलेल्या 27 जणांना निगरानीखाली ठेवण्यात आले असून अजून ही किती जणांचा याच्याशी संपर्क आला होता याचा तपास सुरू आहे. दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिका सह, पालघर नगर परिषद, सफाले, बोईसर, ग्राम पंचायत कार्यक्षेत्र आज राञी 12 वाजले पासून सर्व प्रकारच्या वाहनांना आणि व्यक्तींना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.