तारापूरात डीआरआयच्या धाडीत 90 लाखाचा ईफेड्रिन ड्रग जप्त.

कंपनी मालकासह दोघांना अटक 

मुंबई : (तारापूर) दि. १८ मार्च २०२०, Directorate of Revenue intelligence मागील  ६० वर्षांहून अधिक कालावधीपासून असतित्वात असलेली स्वायत तपास व कारवाई करणारी संस्था असून, डीआरआय अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थांच्या संभाव्य धोक्यांबाबत कारवाई करण्यात व लढा देण्यात नेहमीच अग्रेसर असते. 

एनडीपीएस अधिनियम, १९८५ अन्वये मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थांविरूद्ध केल्या जाणाऱ्या कारवाई अंतर्गत डीआरआयच्या मुंबई विभागाने १७ मार्च २०२० रोजी, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. जगदंबा केमिकल्स, प्लाट नंबर टि - ८८, एमआयडीसी तारापूर येथे गुन्हा दाखल करत द्रव आणि स्फटिक स्वरूपात 483.53 किलोग्राम इफेड्रिन नावाचे ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणी विशेष कामगीरी करत, प्रदिर्घ व सखोल तपासा अंती तारापूर एमआयडीसी मधील में. जगदंबा केमिकलमध्ये इफेड्रिनचे उत्पादन चालू असल्याबाबची खाञी झाल्यानंतर हि सापळा कारवाई करण्यात आली आहे. 

या कारवाईत जवपास रूपये  89,00,000/- (ऐकोन्नवद लाख रुपये ) किमतीचा मुद्देमाल व रोकड जप्त करण्यात आला आहे.

तर जवळपास 5 कोटी रुपये किमतीचा द्रव व स्फटिक स्वरूपातील कच्चा माल हि जप्त करण्यात आला आहे.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, कार्टेलने एक अद्वितीय मोडस-ऑपरेंडी विकसित केली होती, या फॅक्टरीच्या जागेवर ते जॉब वर्क करित असल्याचे दाखवून फॅक्टरी मालकास याच्या मोबदल्यात (भाड्यापोटी) पेमेंट करीत असल्याचे दाखविण्यात येत होते. 

याठिकाणी इफेड्रिनचे उत्पादन घेतले जात होते.  यातील आरोपी अत्यंत चलाख असल्याने ते लवकरच हे ठिकाण बदलून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होण्याच्या तयारीत होते. त्यांचा हा डाव हाणून पाडत अतिशय चानाक्ष व तरबेजपणे हि कारवाई केल्याची माहिती डीआरआयने दिली आहे. 

यापुढे हे उत्पादन कोल्हापूर जिल्हातील चंदगड जवळील दुर्गम भागातील शेत जमीनीत प्रकल्प लावून घेण्याची तयारी सुरू होती. यासाठी त्यांनी या ठिकाणी एक प्रयोगशाळा सुध्दा तयार केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, आणि या ठिकाणी हि काही प्रमाणात इफिड्रीन  सापडले असल्याचे डीआरआयने सांगितले आहे. 

 या बेकायदेशीरकृत्यात कंपनी मालक व अन्य दोन असे तीन व्यक्ती (एक यातील तज्ञ केमिस्ट) सामील होते. यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. या तीघांनी हि गुन्हा कबुल केला आहे.

में. जगदंबा केमिकल ही कंपनी प्रदिप टोकाडे यांच्या मालकीची असून भूपेश पाटिल, चिंचणी सध्या राहणार बोईसर ओस्तवाल हे त्यांचे अँक्टिव्ह पार्टनर आहेत. रवि सिंग मुळचा बिहारचा असलेला या कंपनीत केमिस्टचे काम करत होता. तर या कंपनीचे मालक प्रदिप टोकाडे हे स्वत: केमिकल इंजिनियर आहेत, पार्टनर भूपेश पाटिल हे मार्केटिंगमध्ये पारंगत आहेत. भूपेश पाटिल घर व फोन बंद करून गायब आहेत. प्रदिप टोकाडे, रवि सिंग व हा माल विकत घेणाऱ्या राकेश खानीवडेकर या तीघांना अटक करण्यात आली आहे.मागील प्रदिर्घ कालावधी पासून हे ड्रग्ज स्थानिक बाजारात पैशासाठी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बनविले जात असल्याची कबूली दिली आहे. 

एनडीपीएस कायद्यांतर्गत नियंत्रित पदार्थ असलेल्या इफिड्रिनचे बेकायदेशीर उत्पादन व विक्री केल्यामुळे अंमली पदार्थांचा गैरवापर होतो आणि याचे परिणाम गंभीर होत असतात. यामुळे तरूणांच्या आरोग्यास धोका आणि त्यांना गुन्हेगारीकडे प्रवृत्त होण्यास भाग पाडले जाते. 

याच बरोबर यामुळे दहशतवादास वित्तपुरवठा आणि मनी लॉन्ड्रिंग सारखे गंभीर गुन्हे घडतात. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एनडीपीएसचा हा दुसरी यशस्वी जप्ती असल्याचे सांगितले आहे. 

तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाकडे या व या पूर्वीच्या कंपनी मालकांनी परवाना घेताना ऑर्गेनिक व इनऑर्गेनिक केमिकल कंपाऊड च्या उत्पादनासाठी परवाना घेतला असताना हि या विभागाव्दारे कारखाण्यांच्या नियमित होणाऱ्या तपासण्या, हवा पाणी व केमिकलचे घेण्यात येणारे नमुने हा सर्व प्रकार दिखावा असल्याचे व यांच्याच संगणमताने या कारखाण्यांमधून परवाना वेगळा व उत्पादन भलतेच घेतले जात असल्याचे वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे व अपघातांमुळे समोर येत असते, यामुळे पर्यावरणास तर धोका निर्माण झालेला आहेच, याच बरोबर प्रदूषणात हि मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तर आशा गैर कृत्यांमुळे समाज विघातक व देश विघातक कारवायांना बडावा मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील डीआरआयची हि दुसरी मोठी यशस्वी सापळा कारवाई असली तरी अमली पदार्थ विरोधी पथकाने हि अनेक वेळा तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांवर व उद्योजकांवर कारवाई केली आहे. 

कमीत कमी वेळेत अधिक पैसा कमवीण्याचा हव्यास व मुंबई सारखी अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ग्राहकांची मोठी बाजारपेठ, स्वत:च्या ऐशो आरामासाठी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक लहान लहान उद्योग व उद्योजक बेकायदेशिरपणे अमली पदार्थांच्या उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. 

या प्रकरणी डीआरआयने आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीतांना पोलीस कोठडी सुनावली असून, पुढिल तपास डीआरआय मुंबई विभाग करित आहे.