ओस्तवाल पुन्हा झाला मस्तवाल,  ओस्तवालपाई  तहसिलदार देव, देश व धर्मावर फिरवणार बुलडोज़र??? 

बोईसर भिमनगर शांतिनगर येथिल साई मंदिर व संरक्षण भिंत तोंडून ओस्तवाल ड्रिमलँड या प्रल्पाला रस्त्या देण्यासाठी पालघरचे तहसिदार सुनिल शिंदे यांची शांतीनगरच्या बिल्डरसह शांतीनगरवासीयांना दमबाजी 

बोईसर : दि. 24, मागील तीन ते चार वर्षापासून ओस्तवाल बिल्डरने बोईसर पश्चिम भागातील भिमनगर भैयापाडा याठिकाणी ओस्तवाल ड्रिमलँड नावाचा गृह प्रकल्प उभारण्याचे काम चालू आहे. 

शासकीय अधिकाऱ्यांना हवे ते देऊन आपले काम काढण्यात पाटाईत असलेल्या या बिल्डरला प्लान प्रमाणे व नियमानुसार असलेल्या भौयापाड्यातील रस्त्यामुळे सदनिका व गाळे विक्री होत नसल्याने व हवा तसा दर मिळत नसल्याने या बिल्डरची नजर शांतीनगरच्या अंतर्गत असलेल्या व बोईसर तारापूर या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर आहे. 

परंतु याठिकाणी या कॉम्प्लेक्सची संरक्षण भिंत व साई मंदिर आहे.
या प्रकरणी दि. १५ सप्टेंबर २०१९ रोजी आम्ही वृत्त प्रसिद्ध केले होते. जुना सर्वे नंबर 114 पैकी काही जमीन पूर्वी सरकारी जमीन होती. सध्या ओस्तवाल बिल्डरचे ओस्तवाल ड्रिमलँड या प्रकल्पाचे काम चालू आहे. त्या जमीनी पू्र्वी मूळता काही आदिवासी व्यक्तिंकडे होत्या परंतु कालांतराने त्यांच्या अशिक्षित पणाचा गैर फायदा घेत व महसुल विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा संगमताने काहींनी त्या बळकावल्याचे पुरावे आमच्या हाती आलेले आहेत. 

या नंतर ही जागा ओस्तवाल बिल्डरने घेऊन याठिकाणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बाई बाटली व हवेते पुरवून कागदपञे बनवून इमारती बांधण्याचे काम सुरू केले परंतु याठिकाणी येण्या जाण्याचा रस्ता भौयापाड्यातील वस्तीतून असल्याने या बिल्डरला या ठिकाणचे फ्लाट व गाळ्यांची विक्री करताना हवा तो दर व हवी तशी विक्री होत नसल्याने पुन्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावटगीरी करून 20 वर्षापासून असलेल्या शांतीनगर कॉम्प्लेक्सची भिंत व साई मंदिर तोडून ओस्तवाल बिल्डरला रस्ता देण्यासाठी ओस्तवाल बिल्डर व पालघरचे निच आणि भ्रष्ट तहसीलदार सुनिल शिंदे यांनी घाट घातला आहे. 

या विरोधात आरपारची लढाई लढाई लढण्यासाठी शांतीनगरवासीयांनी ही कंबर कसली आहे. 

यात भ्रष्ट अधिकारी व मस्तवाल झालेला ओस्तवाल बिल्डर साई मंदिर तोडण्यात यशस्वी होणार की शांतीनगरवासीयांना न्याय मिळाणार हे पाहवे लागेल.