उत्तर प्रदेशच्या नक्षलग्रस्त भागात  सापडला सोन्याचा डोंगर 

*भारतातील एकमेव सोन्याची खाण कर्नाटक मधील हट्टी येथे आहे. सध्या या खाणीतून प्रतेक वर्षी १४०० ते १६०० किलो सोन काढल जात. मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसा हे प्रमाण आता वाढवण्यात येणार असून, २०२१ पर्यंत ३५०० टन सोन काढण्यात येणार असल्याचे समजते.* 

उत्तर प्रदेश मधील सोनभद्र हा भारतातला एकमेव असा जिल्हा आहे ज्याच्या सीमा ४ राज्यांशी जोडलेल्या आहेत. पश्चिमेला मध्यप्रदेश तर दक्षिणेला छत्तीसगड, पूर्वेला बिहार आणि  आग्नेयला  झारखंड आहे. हा भागात नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 

भारताच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने १९९२ पासूनच सोनपहाडी भागात शोध सुरु केला होता. २००५ आणि २०१२ साली याठिकाणी सोने असल्याचे स्पष्ट झाले. वर्ल्ड गोल्स काउन्सिलच्या अहवालानुसार भारताकडे सध्या ६२५ टन सोनं आहे. हर्दी येथून निघणारे आणि आता सोनपाहाडी येथे सापडलेल्या सोन्यामुळे यात मोठी वाढ होणार आहे. 

या सोन्याची किंमत अंदाजीतपणे जवळपास १२ लाख कोटी इतकी  होईल असे सांगितले जात आहे. 

ब्रिटिश काळापासूनच उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील सोनपहाडी सोन्याची खाण असल्याचे समजले होते, म्हणूनच या भागास सोनभद्र व सोनपाहाडी असे नाव पडले आहे. सोनपहाडी भागात जवळपास ३५०० टन सोन असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर हर्दीतून प्रतेक वर्षी दिड टन सोन काढण्यात येत आहे. 

भारताच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या जवळपास दोन दशकांच्या अथक परिश्रमानंतर ही सोन्याची प्रचंड मोठी खाण सापडली आहे. भारताकडे सध्या असलेल्या सोन्यापेक्षा हे सोनं ५ पटीने अधिक आहे. 

याच्या पुढिल कार्यवाहीसाठी सरकारने ७ सदस्यीय समिती बनवली असून त्यांच्यावर पुढिल जबाबदारी देण्यात आली आहे. 

हि खाण नक्षलग्रस्त जिल्ह्यात असल्साने पुढे काय काय घडते ते पहावे लागेल.