तारापूर नंतर शहापूरात ही जिंदलकडून शासनास करोडो रुपयांचा महसुली चुना. 

चौकशीसाठी गेलेल्या प्रांतांची गाडी गेटवरतीच अडवल्याचा धक्कादायक प्रकार 

*तक्रादारासह चौकशी व पाहणी करण्यासाठी गेलेल्या प्रांतांची गाडी कंपनीच्या अधिकाऱ्याने गेटवर अडवली, गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा इशारा देताच हवेत उडणारा अधिकारी आली जमीनीवर*   

शहापूर : दि. 15, वाशिंद स्थित में. जेएसडब्लू स्टिल कोटेड प्रोडेक्टस लि. या कंपनीच्या नवीन प्लांटच्या उभारणीचे काम चालू आहे. सध्या तारापरसह शहापूर तालुक्यातील वाशिंद याठिकाणी असलेल्या जेएसडब्लू कंपनीच्या दादागीरी व आठमुठेपणासह शासनाच्या गौण खनिजावरिल रॉयल्टी महसुल बुडविण्याबाबतच्या प्रकरणांची चर्चा जोरदार सुरू आहे. 

यातच दि. 15 रोजी, चौकशी व पाहणीसाठी तक्रारदारासह आलेले प्रांत अधिकारी, श्री. नळदकर, भिवंडी प्रांत अधिकारी, म्हणजेच उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी / उप जिल्हाधिकारी यांची गाडीच अडवून त्यांना कायदा व ज्ञान शिकविण्याचा प्रयत्न करित असल्याचा व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे. तर प्रांत अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा इशारा देताच हा अधिकारी नरम होऊन प्रांतांना चहा पाण्याची ऑफर देताना दिसत आहे. 

*काय आहे संपूर्ण प्रकरण ...*

शहापूर, वाशिंद येथिल में. जेएसडब्ल्यू कंपनीच्या नवीन प्लांटसाठी करण्यात आलेल्या खोदकामातून जवळपास *एक लाख ब्रास मुरूम माती व दगडाचे उत्खनन* करून त्याची परिसारात इतरञ विल्हेवाट लावली असल्याची तक्रार आहे. 

याप्रकरणी शहापूर तहसीलदारांनी चौकशी केलेल्या चौकशी अंती कंपनीने फक्त 4500 ब्रासचीच रॉयल्टी काढल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तर तहसिदारांनी नियुक्त केलेल्या चौकशी पथकाने फक्त 15 हजार ब्रास उत्खनन केल्याचा अहवाल दिला आहे. हा अहवाल चुकीचा व अर्थिक हितसंबंधातून शासनाचे महसुली नुकसान करून कंपनीच्या फायद्याचा असल्याचे सांगत तक्रारदारयांनी तहसीलदार यांच्या कारवाईवर आक्षेप घेत, प्रांत अधिकारी, यांची भेट घेऊन प्रांत अधिकारी श्री. नळदकर यांच्यासोबत याबाबत स्थळ पाहणी व चौकशीसाठी तक्रारदारासमवेत में. जेएसडब्ल्यू कंपनीत गेले मात्र जेएसडब्ल्यू प्रशासनाने प्रांत अधिकारी यांची गाडी कंपनीच्या गेटवरच अडवली आणि प्रांत अधिकारी यांना कायदा शिकवू लागले व त्यांना तक्रारदारासह स्थळ पाहणी व चौकशी करता येणार नाही असे बजावू लागले, कंपनी अधिकाऱ्यांच्या या कृत्यावर प्रांत अधिकारी यांनी त्यांची चांगलीच दखल घेत *गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच में. जेएसडब्ल्यू प्रशासनाचा हवेत उडणारा तो अधिकारी जमीनीवर आला व त्यांना थेट ऑफिसमध्ये बसून चाय पे चर्चा करायची विनवी करू लागला* 

या सर्व प्रकारामुळे जेएसडब्लू ने शासनाची फसवणूक करत करोडो रुपयांचा महसुली चुना लावला असल्याचे दिसून येत आहे. आता में. जेएसडब्ल्यू कंपनीतील उत्खननाबाबत भिवंडी प्रांतअधिकारी काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या में. जेएसडब्लू प्लाट नंबर बी 6 या जुन्या कंपनीत सन 2015 मध्ये नवीन 50 एमएलडी सीईटिपी ओएस 30 मधे करण्यात आलेल्या उत्खननतील जवळपास 2000 हायवा ट्रक भरुण मुरूममातीचा भराव व आतील नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याची तक्रार व माहिती दिलेली असताना ही तात्कालीन तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी स्वत:चे फायद्यासाठी शासनाचे करोडो रुपयांचे महसुली नुकसान करून कंपनीस फायदा पोचविल्याची माहिती विश्वनिय सुञांकडून समोर आली आहे. 

सन 2018 ते आज पर्यंत नवीन प्लांट नंबर बी - 6/2 व 6/3 च्या उभारणीसाठी करण्यात आलेल्या खोद कामात जवळपास 40 हजार चौ. मी. म्हणजे 10 एकर जागेवर मोठ्याप्रमाणावर खोदकाम करून त्यातील मुरूममाती परिसरात इतरञ फेकल्याने शासनाचे करोडो रुपयांचे महसुली नुकसान तर झालेच आहे. परंतु तारापूर औद्योगिक क्षेत्रासह आसपासच्या गावांमध्ये पुरपरिस्थितीत निर्माण होण्यासाठी याच मुरूम मातीचे ढिगारे कारणीभूत असल्याचे समजते. 

तर मागील वर्षी तारापूर औद्योगिक क्षेत्रातीलच ओएस - 46 या भूखंडावरती 13 हजार चौ. मी. क्षेञावर भरणीसाठी बेकायदेशिरपणे वापरण्यात आलेल्या मुरूममातीच्या रॉयल्टी महसुलापोटी जवळपास 96 लाखाच्या दंडाची नोटिस बजावण्यात आली होती. 
यासर्व प्रकरणातून फक्त तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उत्खननतील शासनाचे महसुली नुकसान हे 5 ते 6 कोटी रुपये केले असल्याची माहिती समोर येत आहे. 

या सर्व प्रकरणांवर अध्याप तरी कोणतीच कारवाई व वसुली झालेली नाही. त्यामुळे सर्व सामान्य लोकांकडून सक्तीची वसुली व प्रसंगी त्यांच्या मालमत्तेची जप्ती करणारे प्रशासन यावर कधी व कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.