पिकअप गाड्यांची चोरी करून गाड्या व त्यांचे पार्ट विकणारी अंतर राज्यीय टोळी जेरबंद ... 

*पालघर व ठाणे जिल्हातून 64 वाहने चोरल्याचे उघड, तर 27 गाड्यांची रिकव्हरी करण्यात पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटला यश*

बोईसर - दि. 15, पालघर जिल्ह्यातील चार चाकी वाहनचोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यास आळा घालण्यासाठी व त्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनाखाली बोईसर युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी पालघर जिल्हातील चोरी झालेल्या चार चाकी पिकअपची माहिती घेऊन त्याबाबत कसून चौकशी व तपास करून तपासाअंती 7 आरोपींना ताब्यात घेतले असून, त्याचेकडून पालघर व ठाणे जिल्हातून 64 पिकअप गाड्यां चोरल्याचे उघडकीस आणले आहे. या सर्व आरोपींवर पालघर जिल्ह्यातील डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

हे आरोपी दिवसभर वाहनांची रेकी करून राञीच्या वेळी वाहनांची चोरी करून भिवंडीतील गँरेज मध्ये हि वाहने घेऊन जाऊन त्यांचे इंजिन नंबर व चेसिस नंबर ग्रॉडर मारून पुसून काडून भंगारात कटिंग साठी आलेल्या दुसऱ्या गाड्यांचे नंबर पंच करून त्यांच्या पेपरवरती या गाड्यांची 2 ते 3 लाखाला महाराष्ट्रसह इतर राज्यात विक्री करित असल्याचे उघडकीस आले आहे. 

रोड लगत पार्किंग केलेल्या व चोराता न आलेल्या काही गाड्यांचे स्पेअर पार्ट काडून चोर बाजारात विक्री केल्याचे ही उघड झाले आहे. 

या आरोपींनी पालघर जिल्ह्यातील 51 पिकअप वाहने ठाणे कापूरबावडी परिसपातून 1, गुजरात राज्यातील वलसाड मधून  2, दादरा नगर हवेली मधून 1, असे 55 पिकअप चोरी केले आहेत. तर 5 ठिकाणी पार्किंग केलेल्या परंतु चोरी न करता आलेल्या पिकअपचे स्पेअर पार्ट चोरून विक्री केले आहेत. अशा प्रकारे 64 गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याच बरोबर काही ठिकाणावरून पिकअप बरोबर जनावरांची ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

यापैकी 27 पिकअप गाड्यांची रिकव्हरी करण्यात पोलीसांना यश आले आहे. यात 19 महिंद्रा पिकअप, 6 महिंद्रा मँक्स पिकअप व 2 टोईंन व्हॉन आहेत. 

अटक आरोपी यांनी महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली भागातून चार चाकी वाहनचोरी केलेली असल्याने अजून ही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने, आरोपींना 20 तारखे पर्यंत रिमांड, पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सदरची कारवाई पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनाखाली बोईसर युनिटचे सहा. पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड़, पोलीस उप निरीक्षक अभिजीत टेलर, सहाफौ. विनायक ताम्हाणे, सहाफौ. सुनिल नलवडे, पोहवा. दिपक राऊत, पोहवा. संदिप सुर्यवंशी, पोना. नरेंद्र पाटिल, पोना. निरज शुक्ला, पोना. नरेंद्र जनाठे यांच्या पथकांनी केली आहे. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या सर्व टिमचे या कामगीरी बद्दल विशेष अभिनंदन केले आहे.