सेरेक्स ओव्हरसिज लि. कंपनीतील घातक विषारी केमिकल युक्त रासायन डँमच्या पाण्यात ... 

*महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उप विभाग वाणगाव उप विभागीय अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल*

*महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कंपनी व्यवस्थापनासोबत पार्टिकरण्यात व्यस्त आणि मस्त* 

ताराऱपू - दि. 6, वाणगाव साखरा डँम मध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में सेरेक्स ओव्हरसिज लि या कंपनीतील घातक विषारी टाकाऊ केमिकल युक्त रासायन डँमच्या पाण्यात मिक्स झाले असल्याची स्पष्ट झाले आहे. 

या प्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उप विभाग वाणगाव विभागाचे विभागीय उप अभियंता श्री. धादवड यांनी काल दि. 5 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाणगाव पोलीस स्टेशन मध्ये गु. र. न. 09/2020 भा.द.वि.स. 284 नुसार सेरेक्स ओव्हरसिज लि या कंपनीतील घातक विषारी केमिकल युक्त रासायन साखरा डँम मधील पिण्याच्या पाण्यात सोडल्या प्रकरणी मानवी जीवन व आरोग्य धोक्यात टाकले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास वाणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. राकेश पगारे करित आहेत. 

काल इतर विभागाव्दारे या गंभीर घटनेची पाहणी होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माञ सकाळी फक्त दिखावा म्हणून घटनास्थळी भेटत देत कोणतीही पाहणी व माहिती न घेताच पळ काढल्याने व पुन्हा तारापूरला येऊन कंपनी व्यवस्थापनासोबत पार्टि व मौज मस्ती करत सर्व अहवाल बनविल्याचे उघड झाल्याने नागरिकांमधे तीव्र असंतोष पसरत आहे. 

*महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री डि बी पाटिल यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना तसे न होता कंपनीला देण्यात आलेल्या Closer Direction ला पुन्हा तात्काळ Restart कसे देता येईल यात हे अधिकारी व कंपनी व्यवस्थापन पार्टी करत व्यस्त व मस्त असल्याचे दिसून आल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे* 

प्रत्यक्ष घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर कंपनीने बोईसर उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या पञात नमूद केलेल्या सर्व घटना व माहिती बोगस आणि खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे. 

*याठिकाणी 200 ते 300 लिटर नाहीतर मागील अनेक दिवसांपासून जवळपास 200 ते 300 टन हे घातक रसायन सोडल्यामुळे परिसारातील जवळपास 1 कि.मी. पर्यंतचे गवत व झाडी जळून गेली आहे. जे एगदा 200 ते 300 लिटर केमिकल लिक झाल्याने होणे शक्य नाही.*

*या घातक केमिकलयुक्त रसायनचे पाटच डँमच्या पाण्यात जाऊन मिळतात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.*

दरम्यान दि. 27 जानेवारी 2020 रोजी नागरिकांनी हा टँकर वाणगाव पोलीसांच्या ताब्यात दिलेला असताना ही प्रथम याबाबत आपणास काही ही माहिती नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले होते. परंतु कंपनीने दिलेल्या पञात सदरचा टँकर वाणगाव पोलीसांच्या ताब्यात दिलेला उल्लेख आहे. याबाबतची स्टेशन डायरित नोंद न घेता टँकर सोडून दिल्याने याबाबतची पोलीसांची भूमिका ही संशयास्पद आहे. 

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रामाणिकपणे कर्तव्यपार पाडले जाते की, लाखो लोकांचे जीवन धोक्यात टाकणाऱ्या कंपनीला वाचवले जाते हे पाहावे लागेल.