साखरा डँम लगत सोडलेले केमिकल घातक, विषारी व अवैध 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने   M/s. Sarex Overseas Ltd. कंपनीला उत्पादन बंद करण्याची बजावली नोटिस 

अवैधरित्या घातक टाकाऊ रसायनांची विल्हेवाट लावणाऱ्या व spent Aluminum chloride सारखे घातक मानवी आरोग्य व पर्यावरणास पाण्याला विष बनविणाऱ्या केमिकलची बातमी करणाऱ्या पञकारांवर कारवाई करण्याबाबत कंपनीने उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर यांचेकडे तक्रार. 

तर वाणगाव पोलीसांनी पकडलेली गाडीची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला न देतात का सोडली ?

वाणगाव पोलीसांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात ? प्रस्तुत प्रकरणी माहिती घेण्यासाठी वाणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पगारे यांना फोन केला असता याबाबत काही माहिती नसल्साचे सांगितले होते. माञ कंपनीने दिलेल्या तक्रारीत सदरचा टँकर वाणगाव पोलीसांनी ताब्यात घेतला होता व पेपर तपासून सोडून दिल्याते नमूद करण्यात आले आहे. 

बोईसर - दि.04, डहाणू तालुक्यातील वाणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दितील वाणगाव चारोटी महामार्गावर असलेल्या साखरा डँम लगत दि. 26 जानेवारी 2020 रोजी राञीच्या वेळी टँकर मधून घातक टाकाऊ व विषारी केमिकलयुक्त रसायनाची विल्हेवाट अवैधरित्या लावली जात असताना परिसरातील नागरिकांनी पकडले होते. 

सदरचा टँकर वाणगाव पोलीसांच्या ताब्यात दिलेला होता. परंतु वाणगाव पोलीसांनी प्रथम याबाबत आपणास काही ही माहिती नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. 

कंपनी प्रशासनाशी ही याबाबत विचारणा केली असता कोणताही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. याबाबत बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर व कंपनीव्दारे राजकीय दबावाचा व अर्थिक गैर-व्यवाहाचा वापर करून प्रकरण दाबले असल्याबाबतची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणवादी व सामाजिक संघटनांमध्ये सुरू झाल्याने व याबाबतते व्हिडीओ व पुरावे समोर आल्या नंतर पञकारांनी याबाबत बातम्या प्रसिध्द केल्या व संबधित विभागांकडे तक्रारी ही दाखल करण्यात आल्या.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, M/s. Sarex Overseas Ltd. या कंपनीतून या टँकर मधून पाठविलेले हे केमिकल Spent Aluminum Chloride असून हे या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेतून निघणारे घातक टाकाऊ व विषारी केमिकलयुक्त रसायनच असून, याची कोणतीही माहित या कंपनीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण दिलेली नव्हती व या घातक केमिकलची विल्हेवाट अवैधरित्या लावली जात असल्याने या कंपनीवर तात्काळ उत्पादन बंद करण्याची नोटिस बजावली आहे. 

याचाच राग मनात धरून कंपनीने कोणाचे ही नाव न देता पञकारांवर कारवाई करण्याबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर यांचेकडे तक्रार दिली आहे. 

 Spent Aluminum Chloride कोणत्या उत्पादन प्रक्रियेतून निघते याचा HAZOP study reports व Handling risk study research report बाबतती माहिती औद्यौगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाला दिली नसल्याचे व या टँकर सोबत नसल्याचे ही समोर आले आहे. 

तर या डँमते पाणी डहाणू व पालघर परिसरातील 26 गावे, अनेक आदिवासी पाडे, शाळा व एनपीसीआयएलसह प्रकल्प व उद्योगांना पुरवठा व वापर होत असताना आशा परिस्थितित वाणगाव पोलीसांनी संबंधित विभागास माहिती न देता हा टँकर सोडून दिल्याने व कंपनीने कारवाई झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीमुळे पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अधिकारी यांच्यातील अर्थिक व्यवाहाराबाबत परिसरातील नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेस दुजोरा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कंपनी मालकाने आपण स्वतः तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 50 एमएलडी सीईटिपीचे चेअरमन असून आपली पोच दिल्ली पर्यंत असून आपल्या राजकीय व पोलीसांशी असलेल्या हित संबंधाचा वापर करून ही बातमी करणाऱ्या पञकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना  अडकविणाचा दम वजा संदेश पाठविलेला आहे.