*आखेर रेल्वे भरावाची राख काढण्यास सुरवात* ...

*DFCCIL च्या आदेशानंतर तात्काळ कारवाई*

ग्रामस्थाननी मानले रेल्वे प्रशासनासह प्रसार माध्यमांचे आभार

डहाणू : दि. 24, वानगाव,
मुंबई वड़ोदरा कॅरिडोर च्या  भरावासाठी राखेचा उपयोग सरास पणे केला जात आसल्याचे वर्त प्रसार माध्यमानी प्रशिद्ध केल्या नंतर रेल्वे प्रशासन कडून खाड़ी मध्ये भरावासाठी वापरण्यात आलेली राख काढण्यात आली मुंबई वडोदरा रेल्वे कॉरिडोर च्या कामाच्या भरावा साठी कापशी गावालगत आसलेल्या समुद्र खाड़ी मध्ये राखेचा उपयोग केल्याने कापशी गावातील  स्थानीकानच्या म्हंण्यानुसार ही राख खाड़ी मध्ये टाकल्याने पावसाच्या पाण्याने अथवा समुद्र भर्ती च्या वेळी या परिसरा मधून सूर्या नदी वरुण येणारा बंधारा, नाले, व समुद्र खाडी च्या मुख्य होळ मध्ये  पाण्यामार्गे ही राख वाहत जाऊंन पाणी दूषित होहुन त्यामध्ये मासेमारी व शेती करणाऱ्या शेतकऱ्या साठी घातक ठरू शकते व राखमिश्रित खाडीच्या पाण्यामधील मासे खाले तर मानवी शरीरास कैंसर सारखा गंभीर जीवघेणारा आजार होण्याची दाट शक्यता आसल्याने आम्ही स्थानिक जनतेने अदानी औष्णिक मधून ट्रक, हाइवा,या गाड्या मधून वाहतूक करून आसनगाव, वानगाव कापशी या मार्गावरुन प्रवास करत आसताना प्रचंड प्रमाणात राख उडून नागरिकाना या बाबत प्रचंड त्रास सहन करवा लागत आसल्याने गावकरयानी रेल्वे खाड़ी मध्ये राखेच्या भरावा बरोबरच राखेची वहातुक करत आसलेल्या मालवाहतुक गाड्याच्या  विरोधात आवाज उठवला होता त्यानंतर रेल्वे प्रशासना च्या ठेकेदार कडून खाड़ी मध्ये भरावासाठी वापरण्यात आलेली राख के काढण्यात आली आहे

*{वानगाव रेल्वे स्टेशन च्या पूर्वेस सुरु केलेल्या मुंबई वडोदरा रेल्वे कॉरिडोर च्या भराव कामा साठी टाक़त आसलेल्या राखे विरुद्ध आम्ही स्थानिक रहिवाशानी विरोध केला होता त्यानंतर रेल्वे प्रशासन कडून रेल्वे ठेकेदारास ही राख काढन्याचे आदेश देण्यात आले ग्रामस्थानच्या वतीने आम्ही रेल्वे प्रशासनाचे आभार वेक्त करतो}*

सारस जाधव
ग्रामस्थ कापशी

 
*[खाड़ी मध्ये भरावासाठी वापरण्यात आलेल्या राखे विरोधा बाबत आम्ही गावकरयानी आक्रमक भूमिका घेऊन याला विरोध केला होता त्या विरोधा ची प्रशिद्ध देऊन वरिष्ठ रेल्वे प्रशासन पर्यंत आम्हचा विषय पोचवल्या बदल आम्ही प्रसार माध्यमानचे खुप आभार मानतो]*

सरपंच कापशी
बाबू घहळासर्वच प्रकारची फ्लाय अँश कोळशाची राख घातक नसली तरी सुध्दा, Fly Ash (कोळशाची राख) विशेषत: औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख विषारी, घातक व प्रदूषणकारी असू शकते. त्यांत समाविष्ट घटकांची योग्य प्रकारे चाचणी होणे आवश्यक आहे.

अन्यथा ...

थोडक्यात रासायनिक परिभाषेत स्फटिकासारखे सिलिका आणि चुना इत्यादी विषारी रसायनांचा समावेश यात असतो, जे मानवी आरोग्य आणि पर्यावरणास हानिकारक अाहे.

फ्लाय अँशमध्ये स्फटिकासारखे सिलिका असते ज्यामुळे फुफ्फुसाचा आजार उद्भवू शकतो, विशिष्ट सिलिकोसिसमध्ये, श्वास घेतल्यास प्रसंगी मृत्यु ही ओढवतो व आशा अनेक घटना कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये व कोळशाचा वापर होणाऱ्या उद्योगांमध्ये घडल्या आहेत.

फ्लाय अँश (राख) एक प्रदूषकारी पदार्थ आहे. त्यात अँसिडिक, विषारी आणि किरणोत्सर्गी पदार्थांचा समावेश असतो. या राखेत शिसे, आर्सेनिक, पारा, कॅडमियम आणि युरेनियम सारखे विषारी व घातक पदार्थ असू शकतात.

कारण फ्लाय अँश (राख) हे कोळशाचे एक उप उत्पादन आहे. जे स्वतःच जड धातूंनी भरलेले असते आणि ते घातक व विषारी असते, म्हणून याबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते, जसे की फ्लाय अँश कॉंक्रिटपासून बनवलेल्या इमारती राहणाऱ्या लोकांसाठी सुधा हानिकारक आहे. 

कॉक्रीटमधील फ्लाय अँशच्या सुरक्षिततेबद्दल अजून ही संशोधन सुरू असून, अध्याप त्यावर कोणताही ठोस पर्याय व उपाय योजना झालेली नाही.

सर्वाधिक म्हणजे 65% राख जमीनी अंतर्गत लँड फिलिंग करून नष्ट केली जाते व उर्वरित राख अवैध मार्गाने विल्हेवाट लावली जाते हे दोन्ही प्रकार मानवी जीवन व आरोग्यासह पर्यावरणास घातक आहेत.

*पानथळ जमीनीत या फ्लाई अँशची (राखेची) भरणी वा लँड फिलिंग केल्यास या राखेतील विषारी द्रव्य परिसरातील जमीनीत पसरून जमीन नापिक होण्यासह, जलस्ञोतांमधून याचा प्रादुर्भाव होऊन परिणामी मानवी जीवन व पर्यावरणास धोका निर्माण होऊ शकतो.*