रेल्वे कँरिडोअरच्या लाईनसाठी विषारी व घातक फ्लाई अँश राखेचा वापर 

डहाणू : दि. 21, वानगाव 
मुंबई वड़ोदरा रेल्वे गुड्स कॅरिडोरच्या भरावासाठी राखेचा  सरासपणे राखेचा वापर केला जात आसल्याचे समोर आले आहे. डहाणू येथिल अदानी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर मुंबई वडोदरा रेल्वे कॉरिडोरच्या भरावासाठी वानगाव ते डहाणू दरम्यान या रेल्वे कॉरिडोरच्या पट्ट्यात  भराव टाकण्यासाठी माती, मुरुम व खडीचा वापर करने आवश्यक असताना, तसे न करता याठिकाणी सरासपणे राखेचा वापर केला जात आहे.

ही राख परिसरातील खाड़ीमध्ये टाकली जात असल्याने पावसाच्या पाण्याने व समुद्राच्या भर्तीच्या वेळी या परिसरात जमा होणाऱ्या पाण्यामधून तसेच सूर्या नदी वरुन येणाऱ्या बंधाऱ्यातील पाणी व जवळपासच्या नाल्यांमधील आणि , समुद्री खाडीच्या मुख्य होळींच्या पाण्यामार्गे ही राख वाहत जाऊंन परिसरातील पाणी दूषित होत आहे. यामुळे मासेमारी व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. 

राखमिश्रित खाडीच्या पाण्यामधील मासे व या जलस्ञोंवर अवलंबून असलेल्या शेतीतील फळे व भाजी पाला खालल्यास मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊन, कैंसर सारखा गंभीर जीवघेणा आजार होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही असे अनेक डॉक्टरांनी मत व्यक्त केले आहे. 

अदानी औष्णिक प्रकल्पातून ही राख ट्रक, हाइवा, आशा गाड्यांमधून वाहतूक करून आसनगाव, वानगाव कापशी या आरुन्द मार्गावरून नेली जात असल्याने प्रचंड प्रमाणात राख उडून परिसरात पसरत आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागास अनेक तक्रारी केल्या असून, याचा विरोध ही केला आहे. खड्ड्यांमध्ये अथवा स्पीड ब्रेकर वरून गाडी चालताना गाडीतील राख मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडते याचा त्रास रस्त्यावरुन प्रवासा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर पायी चालणाऱ्या पादचारी व दुचाकी स्वारांना होत असून यामुळे अनेक लहान मोठे अपघात झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. *||श्वसन मार्गातून फुफ्फुससा पर्यंत व डोळ्यात गेल्यास या राखेमुळे विविध गंभीर आजार होऊ शकतात. ही राख धोकादायक आसल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे||*

*{वानगाव रेल्वे स्टेशन च्या पूर्वेस सुरु आसलेल्या मुंबई वडोदरा रेल्वे कॉरिडोर च्या भराव कामा साठी टाक़त आसलेल्या राखे मुळे रेल्वे ला तर मोठे नुसकान होणारच आहे शिवाय आम्हा स्थानिक रहिवाशाना ही याचा खूप मोठा त्रास होहु शकतो म्हणून शासनानी रेल्वेच्या ठेकेदारा वर्ती लवकर कार्रवाई करावी}*

राहुल पड़गे
रहिवाशी कापशी

*[वाणगाव रेल्वे स्टेशनच्या लगत पूर्वेस मुंबई वडोदरा रेल्वे केरिडोर च्या कामाच्या ठिकाणी राखेची भरणी करत आसल्याची माहिती समोर आली आहे त्याची योग्य चौकशी करून अहवाल पुढील कारवाई साठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल]*

नरेश नार्वेकर
वाणगाव तलाठी

सुञांकडून मिळालेल्या माहिती नुसार अदाणी डहाणू थर्मल पावर प्लांट मधून निघणारी फ्लाय अँश राखेची विल्हेवाट लावण्याचे काम काही ठेकेदारांकडून केले जाते या ठेकेदारांनी मुंबई डहाणू गुडस कॉरिडोअरचे काम करणाऱ्या ठेकेदारा सोबतच संगणमत करून अर्थिक फायद्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

*तर या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यात अदानी पावर प्लांट डहाणू प्रशासन अपयशी ठरलेले दिसत आहे.*

या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने याबाबतची माहिती डिएफसीला देण्यात आलेली आहे.

यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे