*तारापूर कंपनीतील स्फोट*
*मृतांच्या नातेवाईकांना*
*प्रत्येकी 5 लाख रुपये मदत*
*मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते*

तारापूर : दि 15: तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी   प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केलेली होती तर जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जाणार असल्याचे ही सांगितले होते.
स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन होते. 

दिनांक 11/ 01/ 2020 रोजी संध्याकाळी 6:45 वाजताच्या सुमारास तारापुर - बोईसर औद्योगिक परिसरातील में. एएनके फार्मा प्रा. लि. प्लॉट नंबर एम. 2, या कंपनीमध्ये झालेल्या भिषण स्फोटात 8 जनांचा बळी गेला होता, ज्या 8 जनांचे बळी गेले होते त्या मयत व्यक्तीच्या वारसांना  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली होती. त्यानुसार मयतांचे वारस इलियास बशीर अन्सारी (40 वर्ष ) आसमा इलियास अन्सारी - पत्नी,  निशु  राहुल सिंग (26) राहुल वशिष्ठ सिंग - पती, माधुरीदेवी  वशिष्ठ सिंग (46) वशिष्ठ  मदन सिंग - पती, गोलु सुरेंद्र यादव (19) सुरेंद्र भरत  यादव - वडील, राजमती देवी सुरेंद्र यादव (40) सुरेंद्र भरत  यादव - पती, मोहन सूर्यभान  इंगळे (५५) मंगला मोहन इंगळे - पत्नी, त्रिनाद दासरी (4०) प्रलंबित  , खुशी सुरेंद्र यादव (13) सुरेंद्र भरत  यादव - वडील. यांना आज तारापूर येथिल टिमा हॉल मध्ये 
मंजूर अर्थसहाय्याचे वाटप मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना  आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करून, मा श्री राजेंद्र गावित, खासदार पालघर,
मा श्री श्रीनिवास वनगा, आमदार पालघर विधानसभा मतदारसंघ,
मा श्री राजेश पाटील,आमदार बोईसर विधानसभा मतदारसंघ,
श्री सुनिल शिंदे तहसीलदार पालघर,
श्री अनिल वायाळ  
मंडळ अधिकारी तारापूर,
श्री मनिष वर्तक
मंडळ अधिकारी बोईसर,
श्री संतोष गवते  अवल कारकून तहसिल कार्यालय पालघर,
श्री हितेश राऊत तलाठी सरावली,
श्रीमं तेजल पाटील तलाठी कोलवडे,
श्री साईनाथ पाटील, श्री नितीन धोडी कोतवाल आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.