हे सरकार संवेदनशील सरकार, उद्योग मंञी सुभाष देसाई. 

"मुख्यमंत्री प्रत्येक क्षणाचे अपडेट घेत असून मृतांच्या वारसांना मदत व जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन तातडीने करणार"

बोईसर दि.12 :- तारापुर औद्योगिक क्षेत्रातील में. एएनके फार्मा प्रा. लि. प्लॉट नंबर एन - 2, कारखान्यात काल शनिवारी सायंकाळी 6:45 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या 8 झाली आहे. 7 जण जखमी असून मालक नटूभाई उर्फ नटवरलाल पटेल यांच्यावर मिरारोड येथिल वाकाड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी पालघर यांनी दिली आहे. 

दरम्यान कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून अग्निशमन दलाच्या जवानांसह एऩडीआरएफची एक तुकडी मदत व बचाव कार्य करित आहे. 

*काही जखमींची स्थिती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.* 

         सदर कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून Bulk Drugs बनवण्याची परवानगी घेतली होती, मात्र याबाबत अन्न व औषध प्रशासन FDA तसेच DISH औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग वसई (Directorate of Industrial Safty and Health ) यांच्याकडे उत्पादनांविषयी कोणतीही नोंदणी व परवानगी घेतली नसल्याचे DISH चे उप संचालक अशोक खोत यांनी सांगितले आहे.  

शनिवारी संध्याकाळी 06:45 वाजताच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत 8 जणांनांचे मृतदेह मिळून आले आहेत. 1)इलियास बशिर अन्सारी 45, 2) सौ. निसु राहुल सिंग 26, 3) माधुरी वाशिब सिंग 46, 4) उमेश मदन सिंग 39, 5) गोलु सुरेंद्र यादव 20, 6) राजमतीदेवी सुरेंद्र यादव 40,7) मोहन काका व 8) खुशी सुरेंद्र यादव 40 अशी नावे असून,

 7 जन गंभीर जखमी झाले आहेत. 1) मुलायम जगतबहादुर यादव 22, 2) राकेशकुमार चैनराम जैस्वाल 50, 3) सचिन कुमार रामबाबू यादव 18, 4) रोहित वाशिब सिंग 20,  5) प्राचि राहुल सिंग, 6) रुतिका राहुल सिंग 3 या जखमींवर सध्या बोईसर मधील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रिॲक्टरमध्ये ब्लास्ट होऊन हा अपघात घडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून या ब्लास्ट मुळे कंपनीची संपूर्ण इमारत कोसळली आहे. त्यानंतर ही दुर्घटना ऐवढी भिषण होती की, एनडीआरएफला पाचारण करावे लागले. शनिवारी मध्य राञी पर्यंत 6 व रविवार दुपार पर्यंत 2 असे 8 मृतदेह शोधण्यात एनडीआरएफला यश आले आहे. 

यानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास एनडीआरएफकडून बचाव कार्य थांबवण्यात आले आहे.  

सदर घटनास्थळी कालपासूनच पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे , पोलीस अधीक्षक गौरव सिंग,  पालकमंत्री दादा भुसे, स्थानिक आमदार व लोकप्रतिधिंनी पाहणी करून जखमींची विचारपूस व चालू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेत होते.

दरम्यान आज रविवार रोजी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या ठिकाणी भेट देवून घटना स्थळाची पाहणी केली व तुंगा हॉस्पीटलला जाऊन जखमींची पाहणी व चौकशी करून आवश्यकती मदत तात्काळ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन व हॉस्पीटला दिले आहेत. 

मृतांना ही 5 लाखाची मदत तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर मृतदेह हव्यात्याठिकाणी पोचविण्यासाठी व अंतविधीसाठी लागणारा सर्व खर्च शासन करणार असल्याचे ही उद्योगमंञ्यांनी सांगितले. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून मोठ मोठ्या दुर्घटना सतत होत आहेत. परंतु औद्यौगिक अपघातील मृत व जखमी कामगारांना शासना तर्फे मदत करणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या व कामगारांच्या समस्या व वाढत्या प्रदूषणावर आणि अपघातांवर सक्षम उपाय योजना मुख्यमंत्राकडून करण्यात येतील, तर आवश्यक त्याठिकाणी कायद्यात व नियमावलीत बदल केले जावेत अशी मागणी होत आहे. 

प्राथमिक पाहणीत हा कारखाना अनधिकृत असल्याचं समोर आले असून, ज्या इमारतीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखाण्यास उत्पादन घेण्यासाठी दि. 02 जानेवारी 2020 रोजी संमत्तीपञ दिले आहे, त्या इमारतीस फक्त तळ + पहिल्या मजल्यास एमआयडीसीने बांधकाम परवानगी दिलेली होती. परंतु या इमारतीत बेकायदेशिरपणे तळ + 2 मजले म्हणजे तीन मजल्याचे बांधकाम करण्यात आले असून अजून ही बांधकाम सुरूच असल्याने याच इमारतीत बांधकामावर काम करणारी 4 कुटूंब राहत होती. 

तर बांधकाम पुर्णत्वाचा दाखला न घेताच व बांधकाम पूर्ण होण्यापू्र्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादनाचे संमत्तीपञ घेऊन उत्पादन चालू केल्याचे निदर्शनास आले आहे. 

हे सरकार संवेदनशील सरकार असून यात जे कोनी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंञालयात विशेष बैठक आयोजीत केली असून, या सर्व प्रकारामुळे ते चिंतीत व व्यथित असून असे विनाषकारी उद्योग सुरू ठेवावे की नाही याबाबत व समिती स्थापन निर्णय घेण्यात येणार आहे. 

आता सरकार बदलले आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे चुकले  आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करू असं आश्वासन सुभाष देसाई यांनी टिमा मध्ये घेतलेल्या पञकार परिषदेत दिले आहे.  

प्रत्यक्षात माञ कारवाई होणार की, नेहमी प्रमाणेच अहवाल व कारवाई लाल फितीत अडकणार ते पाहवे लागेल...या भिषण स्फोटातून प्राचि राहुल सिंग, वय वर्ष 6 व रुतिका राहुल सिंग, वय वर्ष 3, या दोघी लानग्या बहिणी दैव बलवत्तर म्हणूनच वाचल्या आहेत. 
त्यांची आई निसु व आजी माधुरि या दोघींचा या स्फोटात मृत्यु झाला आहे. 
या दोन्ही मुलांना प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले आहे. 

स्फोटाच्यावेळी वडिल राहुल सिंग पानाच्या टपरिवर व या मुली कंपनीच्या गेट जवळच खेळत असल्याने स्फोटामुळे उडालेल्या इमारतीचे काही तुकडे लागून किरकोळ जखमी झाल्या होत्या. 

या दोन लहान मुलींचा आई शिवाय साभांळ कसा करायचा हा मोठा प्रश्न असल्याचे व त्यांना त्यांची आई कुठे आहे हे  समजवण्याचे आव्हान व दुख असल्याचे वडिल राहुल सिंग व आजोबा वाशिब यांनी सांगितले.