तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एएनके फार्मा कंपनीत भिषण स्फोट, तीघांचा मृत्यु तर अनेक गंभीर... 

तारापूर : दि. 11, सायंकाळी 6:45 वाजताच्या सुमारास भिषण स्फोट व आवाजाने जवळपास 7-10 कि.मी.च्या परिसरात तीव्र धक्का बसला याची तीव्रता इतकी होती की याचा आभास व जानिव जवळपास 25 कि. मी. पर्यंतच्या परिसरातील लोकांपर्यंत पोचली होती. 

स्फोटानंतर जवळच असलेल्या कोलवडे व कुंभवली गावातील नागरिक जबरदस्त भूकंपाचा धक्का बसला असल्याचे समजून आपल्या घरातून बाहेर पडले होते. परंतु क्षणातच आकाशात आगीचे लोळ दिसू लागल्याने हा जवळच्याच केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याचे समजले. 

में. एएऩके फार्मा प्रा. लि. प्लाट नंबर एम - 2, ही कंपनी (पूर्वाश्रमची में. तारानायट्रेट) नटूभाई पटेल यांनी दोन वर्षापूर्वीच विकत घेतलेली होती. या कंपनीचे चार मजली बांधकाम ही चालू असल्याने कंपनीच्या आतच जवळपास 15 ते 20 कामगार वास्तव्यास असल्याचे समजते. सध्या कंपनी मालक नटूभाई यांच्या सह तीन कामगारांचा या स्फोटात मृत्यु झाला असून अन्य 5 जन गंभीर जखमी झाले आहेत. 
तर मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता व सुरक्षा व्यवस्था न करता इमारतीचे बांधकाम चालू असताना अवैधरित्या केमिकलचे उत्पादन घेतले जात असल्याचे समोर आले असून, केमिकल प्रक्रिये दरम्यान झालेल्या भिषण स्फोटात बाजूच्या में. गँलेक्सी सेफ्रिकेंटस लि. या कंपनीचे हे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, याच कंपनीच्या बाजूच्या खुल्ल्या प्लॉटवर एमआयडीच्या व अऩ्य ठेकदारांचे कामगार अवैधरित्या झोपडी बनवून राहत होते, त्यांच्या झोपड्यांवर या स्फोटातील व इमारतीचे अवशेष उडून गेल्याने यापैकी ही काही कामगार जखमी झाले असल्याचे समजते आहे.*तारापूर कंपनीतील स्फोट*
*मृतांच्या नातेवाईकांना*
*प्रत्येकी 5 लाख रुपये मदत*
–-------------
*मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून*

मुंबई दि 11: तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी   प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत
स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे
मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

अपडेटस मिळविण्यासाठी आमच्या बोईसर तारापूर मिञ / Boisar Tarapur Mitra फेसबुक पेजला व  www.tarapurmitra.com वेबसाइट लोईक व शेयर करा