पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या बदलीसाठी वाळू (रेती) व  चाळ माफियांच्या मंञालय वाऱ्या. 

"पालघर जिल्हातील वसई विरार परिसरात दररोज लाखो रुपयांचे हप्ते देऊन वाळू (रेतीची) खुल्लमखुल्ला तस्करी व स्थानिक नगरसेवक व महानगर पालिका अधिकारी यांना हाताशी धरून अनधिकृत बांधकाम व जमीनी बळकावण्याचे धंधे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या धडक कारवाईमुळे बंद झाले आहेत." 

पालघर : BTM ऩ्यूज नेटवर्क - पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्या नंतर (2017-18) गौरव सिंह यांनी वाळू (रेती) माफिया व यानंतर अनधिकृत बांधकाम व अवैधरित्या जमीनी बळवावून सर्व सामान्य लोकांना फसविणाऱ्यांना (चाळ माफियांवर) धडक कारवाई करण्यास सुरवात केल्याने, विशेषत: वसई विरार परिसरातील सामाजिक व पालघर जिल्ह्याच्या इतर भागातील धाबे दणानलेल्या या माफियांनी त्यावेळी स्थानिक नेत्यांच्या मदतीने मांडवली करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गौरव सिंह यांनी यांना भिक न घातल्याने यांनी मंञालयाच्या वाऱ्या ही केल्या होत्या, परंतु त्यावेळी अनेक नागरिकांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे याबाबत तक्रारी दिल्या नंतर फडणविसांनी यात हस्तक्षेप करत त्या मंञ्यास व स्थानिक नेत्यांना चाप लावला होता. यामुळे मागील दोन ते तीन वर्षात पालघर जिल्ह्यातून अनेक वाळू (रेती) तथा गौण खनिज माफिया व चाळ माफियांवर गुन्हे दाखल करून करोडो रुपयांचा महसुल वसुल करण्यात आला आहे. 

आता माञ सरकार बदलल्या नंतर पुन्हा या वाळू (रेती) तथा गौण खनिज माफिया व चाळ माफियांनी या स्थानिक लोकप्रतिधी व नेत्यांन करवे मंञालयाच्या वाऱ्या चालू केल्या असून सरकार दरबारी साकडेच घातल्याची खाञीलायक माहिती विश्वनिय सुञांकडून प्राप्त झाली आहे. 

या सर्व प्रकारामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी व नागरिकांमध्ये या स्थानिक नेत्यांबाबत तीव्र असंतोष असून, संतापाचे वातावरण आहे. मागील वेळी ज्या प्रमाणे फडणविसांनी हस्तक्षेप करत या माफियांना व नेत्यांना चाप लावला होता तसाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करून गौरव सिंह यांच्या बदलीसाठी साकडे घालणाऱ्या माफियांना व स्थानिक भ्रष्ट नेत्यांना चाप लावून, पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांची बदली होऊ देऊ नये, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.