*सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप साहृदयविकाराच्या धक्काने दुःखद निधन*

पालघर : दि. ४, पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप, वय 38 वर्ष,  नाशिक येथील मूळचे राहणार होते. 

मागील वर्षीच त्यांनी सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला  होता. त्यांच्या पार्थिवावर त्याचे मूळ गावी नाशिक येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सफाळे पोलीस स्टेशन अंतर्गत, येथील मकुणसार भागात आज क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी मैदानात खेळत असताना सहायक पोलीस निरीक्षक सानप यांना हृदय 
विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तत्काळ वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये  घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

*भावपूर्ण श्रध्दांजली*