*उध्दवा अजब तुझे सरकार* 

"९३ च्या स्फोटांचे मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि याकूब मेमनचा कट्टर समर्थक महाराष्ट्राचा कैबिनेट मंञी" 

मुंबई : दि. 30, (BTM ऩ्यूज नेटवर्क); उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात 
महाविकासआघाडीच्या 26 कैबिनेट व 10 राज्यमंञ्यांचा शपथविधी पार पडला, यावेळी कॉग्रेसचे अस्लम शेख यांना ही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. 

दहशतवादी याकूब मेमनला समर्थन देत त्याच्या फाशीला विरोध करणारे पत्र लिहून फाशी रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करणाऱ्या आमदाराचा समावेश उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. 

हे पञच सर्वांन समोर आले आहे. हे पञ लिहणारे दुसरे तिसरे कोणी नसून काँग्रेस आमदार अस्लम शेख आहेत. महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळून आतंकवाद्यांचे समर्थन करणारे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 

दि. २८ जुलै २०१५ रोजी याच अस्लम शेख यांनी राष्ट्रपती महोदयांना याकूब मेमनला फाशी देऊ नये असे पत्र लिहिले होते. 

याकूब मेमनच्या दया अर्जाचे व त्याचे समर्थन करत त्याला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी अस्लम शेख यांनी राष्ट्रपतींकडे केली होती. 

 १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाचं प्रकरणाची सुनावणी कोर्टा मध्ये १५ वर्षे सुरु होती, या प्रकरणी निकाल देताना कोर्टाने १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती, यात  याकूब ही होता.

९३ च्या बॉम्ब स्फोटांचे मुख्य सूत्रधार हे दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि याकूब मेमन हे तिघे असल्याचे कोर्टाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. 

याकूब मेमन हा व्यवसायाने CA होता, व तो दाऊद आणि टायगर मेमन यांचे आर्थिक व्यवहार पाहत होता असे त्याच्यावर आरोप होते. 

३० जुलै २०१५ ला याकूब मेमनली फाशी देण्यात आली.