बोईसर विधानसभा पुन्हा बविआकडेच

बोईसर - दि. 24, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतमोजणी नंतर, बोईसर विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यादा बहुजन विकास आघाडीने बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

बविआला प्रचंड बहुमत न मिळाण्यामागे व सत्ताधारी पक्ष या जागेवर विजय मिळवण्यात थोड्यात कमी पडण्यामागचे महत्वपूर्ण मुद्दे म्हणजे, *प्रधानमंत्री आवास योजनेत फसवणूक झालेल्या जवळपास 4500 कुटूंबांंचा मतदानावरिल बहिष्कार आणि सेना बीजेपी या दोघांच्या भांडणातून 2014 च्या निवडणूकीप्रमाणेच बविआला लाभ झाला असे दिसून येत आहे. 

बोईसर विधानसभा मतदार संघात मागील दोन वेळा बहुजन विकास आघाडीने बाजी मारली होती आणि यावेळी ही तसेच झाले. माञ विजयाची आकडेवारी चिंतन करावयास लावणारी आहे.

2009 व 2014 ची मतदानाची टक्केवारी व प्रबळ दावेदारी करणाऱ्या बहुजन विकास आघाडी, शिवसेना व भाजपाचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांच्यात ही तिरंगी लढत होती.

पालघर विधानसभा मतदार संघातून पुर्ऩरचना होऊन बोईसर विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 2009 पासून या जागेवर बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. 2009 ला प्रथम निवडणूकीत बोईसर विधानसभा मतदार संघात एकूण 2,43,557. मतदारांची नोंदणी होती या पैकी 1,37,940. मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला होता ज्याची टक्केवारी 58.00% होती.
बहुजन विकास आघाडीच्या विलास तरे यांना 53 हजार 727. 38.95% मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्या सुनील धानवा यांना 40 हजार 649. 29.47% मतं मिळाली होती. तर 31,182. 21.60% मते मनसे व अन्य उमेदवारांमध्ये विभागली होती.

2014 ला मतदारांची संख्या वाढून 2,52,411.झाली होती त्या पैकी 1,71,278. 68% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता बोईसर मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी च्या विलास तरे यांनी 64 हजार 550 एवढी मते घेत विजय मिळवला होता.  दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे कमलाकर दळवी होते. त्यांना 51 हजार 677 मते मिळाली होती. आणि त्यांचा 12 हजार 873 मतांनी पराभव झाला. तिसऱ्या स्थानावर भाजप चे जगदीश धोडी, 30 + ने तर चौथ्या स्थानावर अपक्ष चे सुनील धनवा आणि पाचव्या क्रमांकावर मनसे चे वसंत रावते होते.

एकंदरित 2009 व 2014 च्या तुलनेत 2019 च्या निवडणूकीचा तुलनेत 2019 च्या मतदारयादी नुसार 3,15,302 मतदारांची नोंदणी झालेली होती, या वेळी 67.68% मतदान झाले होते. 2,13,105. इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता, भाजपाने शिवसेने विरूद्ध अपक्षाच्या नावावर केलेले बंड व प्रधानमंत्री आवास योजनेतून फसवणूक झालेल्या नागरिकांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार याकडे सत्ताधारी सेना भाजपाने जानिवपूर्वक केलेले दुर्लक्ष, यातून पुन्हा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारासच फायदा मिळाला आहे.

यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला असे म्हणन्यास हरकत नाही.

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटिल हे 78703 मते मिळवत 2752 मतांनी विजयी झाले आहेत.

बोईसर मतदार संघात 8 उमेदावार निवडणूकीच्या रिंगणात होते.

महाराष्ट्र
जिल्हा पालघर
बोईसर 131 (अज)
                      
*अंतिम आकडेवारी*

*चुरशीच्या लढतीत शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये पारडे फिरले*
*बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांचा 2752 मतांनी विजय* झाले आहेत.

1) विलास सुकुर तरे.           2968 + 53 = 75,951

2) दिनकर वाढान.     332 + 11 = 14,780

3) सुनिल गुहे            51  + 02 = 1857

4) रजेशिंग कोळी.      36. + 08 = 2,882

5) राजेश रघुनाथ पाटील.   (बहुजन विकास आघाडी)    5539 + 32 = 78,703

6) रुपेश धांगडा.         86 + 02= 1, 986

7) श्याम गोवारी.          23 + 01 = 1,119

8) संतोष शिवराम जनाठे.   (अपक्ष)      232 + 20 = 30,952

9) नोटा                       78 + 06 = 4,622

त्यामुळे बोईसर विधानसभा मतदार संघातील सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.