*एनपीसीआयएल आणि उद्योजकांच्या सी एस आर चा गोलमाल व झोल* 

संपादकीय विशेष :-

सी.एस.आर. Corporate Social Responsibility म्हणजेच उद्योगांची सामाजिक जबाबदारी?

याबाबत या उद्योजकांनाच विचारु आणि ही सर्व माहिती सर्वांपर्यंत पोचावूया ज्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत तारापुरला मिळालेला पहिला नंबरचा डाग कमी करून पहिल्या नंबर वर असलेले प्रदूषित तारापुरला स्वच्छ श्वास घेता येईल.

 प्रत्यक्ष पीडित असलेल्या तारापूर ओद्योगिक क्षेत्रास आज पर्यंत या उद्योगांकडून व एनपीसीआयएल (टीएपीएस) च्या सीएसआर मधून काय मिळाले आणि नियम व विनियमन या नुसार काय मिळायला हवे होते. यात पुढील काही प्रमुख बाबींचा समाविष्ट आहे: ज्या गोष्टि प्रामुख्याने मिळायला हव्या होत्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरांमुळे कधी मिळाल्याच नाहीत. 

यात लोकाभिमुख नेतृत्वाचा ही अभाव तेवढाच आहे. 

या सी एस आर फंडाचा प्रामुख्याने खालील बाबींवर खर्च होणे आवश्यक आहे.  

i) उपासमार, दारिद्र्य आणि कुपोषण निर्मूलन, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आणि स्वच्छता संवर्धन करण्यासाठी आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या स्वच्छ भारत कोशमध्ये योगदान देणे.

 

ii) विशेषत: मुले, महिला, वृद्ध आणि वेगवेगळ्या सक्षम आणि उदरनिर्वाहासाठी वृद्धिंगत करण्याच्या प्रकल्पांमध्ये विशेष प्रशिक्षण आणि रोजगार वाढविणारे व्यावसायिक कौशल्य यासह शिक्षणाची जाहिरात करणे इ.

 iii) लैंगिक समानतेचा प्रचार करणे, महिलांचे सक्षमीकरण, महिला आणि अनाथांसाठी घरे आणि वसतिगृहे सुरू करणे; ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम, डे केअर सेंटर आणि अशा इतर सुविधा आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटांना असणारी असमानता कमी करण्यासाठी उपाययोजना इ. 
 
iv) पर्यावरण शाश्वतता, पर्यावरणीय संतुलन, वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण, प्राणी कल्याण, कृषी-वनीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि माती, हवा व पाण्याची गुणवत्ता राखणे यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ गंगा फंडाची स्थापना केली आहे. गंगा नदीचे कायाकल्प.
 
v) राष्ट्रीय वारसा, कला आणि संस्कृतीचे रक्षण करणे यासह इमारतीची पुनर्संचयित करणे आणि ऐतिहासिक महत्त्व असणारी साइट आणि कलाकृतीची कामे; सार्वजनिक वाचनालये उभारणे; पारंपारिक कला आणि हस्तकलांचा प्रचार आणि विकास इ. 
 
vi) सैन्य दलातील दिग्गज सैनिक, युद्ध विधवा आणि त्यांच्या अवलंबितांच्या फायद्यासाठी उपाय योजना इ. 
 
vii) ग्रामीण खेळ, राष्ट्रीय मान्यता प्राप्त खेळ, पॅरालंपिक खेळ आणि ऑलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण इ. 
 
viii) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आणि मदत आणि कल्याणसाठी केंद्र सरकारने स्थापित केलेली इतर राष्ट्रीय मदत निधी किंवा इतर कोणत्याही निधीमध्ये योगदान इ. 
 
ix) शैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञान इनक्यूबेटरना देण्यात येणारे योगदान किंवा निधी जे केंद्र सरकारद्वारे मंजूर आहेत. 
 
x) ग्रामीण विकास प्रकल्प
xi) झोपडपट्टी क्षेत्र विकास प्रकल्प 

 आशा प्रकारे या सी एस आर चा वापर होणे आवश्यक आहे. परंतु या सर्व बाबींवर खर्च केल्यास कमिशन रुपात मिळणारी मोठी रक्कम मिळणे अवघड असते त्यामुळे एनपीसीआयएल तारापूरचे अधिकारी वरिल पैकी आत्यावश्यक असलेल्या, i ते xi या बाबींवर काम व खर्च न करता या फंडातून रस्ते निर्मिती आणि त्यांचा दुरुस्ती व देखभाल यांचेवर अधिकाधिक रक्कम खर्च करताना दिसत आहेत. तसेच ही सी एस आर ची रक्कम प्रस्ताव नसल्याचे कारण देत, याबाबत तारापूर परिसरातील सामाजिक कामे व याबाबतची जनजागृती न करता फक्त कमिशन रुपात मोठी रक्कम मिळेल आशा ठिकाणी इतरञ वळवत असल्याने कोट्यावधी रुपयांचा या सी एस आर फंडापासून व मूलभूत हक्कांपासून परिसरातील नागरिकांना ज्या प्रमुख आरोग्य, शिक्षण या सारख्या क्षेत्रात विकास होत नसल्याचे दिसून येत आहे. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सी एस आर ची रक्कमेचा वापर कुठेच होताना दिसून येत नाही. टाटा, जिंदल व लुपिन सारख्या कंपन्या औद्योगिक परिसरापासून दूरवरच्या आदिवासी पाड्यांवर लोकांची दिशा भूल करत एखाद शौचालय वा सौर ऊर्जेचा पथ दिवा किंवा वरवरची आरोग्य तपासणी शिबिर घेऊन लाखो करोडो रुपयांचा खर्च दाखवून सरकार व जनतेची फसवणूक करत आयकरात मोठी सूट मिळवत लूट करत आहेत. 

जो पर्यंत हा या सी एस आर फंडाचावापर वरिल दिलेल्या कामांसाठी इमानदारी होत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने तारापूर औद्योगिक क्षेत्राचा व परिसराचा व नागरिकांचा आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातला विकास खऱ्या अर्थाने होणार नाही. 
याकडे सर्व नागरिकांनी व जिल्हाधिकारी पालघर यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 

गजानन ना. मोहिते 
संपादक - बोईसर तारापूर मिञ 
संघटक पालघर जिल्हा, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (राळेगणसिद्धी)
9322796862